मी एक वेडा वाचक आहे आणि ठार वेडा लेखक. मी कविता करतो म्हणून तुम्ही मला विकवी असं म्हणू शकता किंवा विशबाबा सुद्धा म्हणू शकता. मी स्वतः लिहिलेल्या सत्यकथा, काल्पनिक कथामलिका, विकविता आणि बरचं काही फक्त तुमच्यासाठी घेऊन येतोय. नक्की वाचा.

Book Summary
धक्का!...अनपेक्षित गोष्टीमुळे, घटनेमुळे, व्यक्तीमुळे बसलेला धक्का! ह्यापैकी कोणामुळेही तुम्हाला कधी धक्का बसला असेल तर तो तुमच्या मनात आजही जीवंत असेल. माझ्या आयुष्यात मी एक रात्र अनुभवली होती, जी माझ्या मनात 'धक्क्यांची रात्र' बनून राहिली आहे. त्या एका रात्रीत माझ्या मनाला-बुद्धीला एकामागून एक अनपेक्षित धक्के बसले होते. मी त्या रात्रीला धक्क्यांची रात्र का म्हणतोय हे तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. माझ्या बुद्धीत बंदिस्त असलेल्या जुन्या आठवणीतल्या व्यक्ती, घटना, प्रसंग आज अस्पष्ट आहेत. मी अनुभवलेल्या घटना आज धुक्यासारख्या इतक्या धुसर झाल्या आहेत, ज्यांची नेमकी मांडणी कशी करु तेच मला कळत नाही. हो, एक मात्र खात्रीने सांगतो, जे घडलं होतं ते मी स्वतः पाहिलं होतं, अनुभवलं होतं, ते सर्व सत्य जसच्या तसं तुम्हाला सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.