Shweta Deshpande - (18 March 2023)नमस्कार शास्री सर, आपण ऋचा ताई बद्दल लिहीलेले अगदी तंतोतंत खरंय, माझाही अनुभव खूप छान आहे, अतिशय विनम्र, हसतमुख,.सप्तसूरांच्या लयीत असणारा गोड आवाज, तत्परतेने मदतीसाठी तयार असणारी अशी ही ऋचा आहे, मला तर माझे साहित्य पोस्ट पण करता येत नव्हते, प्रत्येक वेळी ऋचा ला करावं लागत होतं,तिलाच त्रास देते पण कधीही न विसरता, न चिडता ऋचा हे करते, ऋचा मुळे शाॅपिजन सारखा मंच लाभला आणि आपले स्वप्न पुर्ण करण्याची संधी मिळाली, आपलं चुकलं तरी छान लिहिलंय अजून प्रयत्न करा असं बोलून ऋचा सदैव प्रोत्साहन देत असते व आपल्यातला आत्मविश्वास वाढवते, हे सगळं एखादं दैवी वरदान असलेल्याला शक्य आहे आणि ऋचाला असं हे दैवी वरदान लाभलेलं आहे, सदैव मदत करून लिखाणास प्रोत्साहन देवून लिखाणाची आवड वाढवून मार्गदर्शन करता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ऋचा
23
Smita Bhalme - (18 March 2023)हसतमुखाने संवाद साधणारी.....मनापासून सहकार्य करणारी.....गोड स्वभावाची.....मधूर भाषिणी.....सर्वांना हवीहवीशी वाटणारी.....अशी ही *ॠचा*
Manisha Wandhare - (17 March 2023)पहिल्यांदा भेटून काय ? बोलावे हा प्रश्न ज्या व्यक्तीजवळ पडत नाही . ती व्याक्ति म्हणजे ऋचा मॅडम ... अगदी मनातली गोष्टही त्यांच्या जवळ सहज निघते . थँक्यु या प्रेमळ साहित्यीक मैत्रीसाठी🙏😘
21
SAROJINI BAGADE - (17 March 2023)सर ऋचा बद्दल आपण जे काही लिहिलंय ते १००% नाही तर १००१% टक्के खरं आहे असे म्हंटले तरी अतिशयोक्ती होणार नाही असे मला स्वानुभवावरून म्हणावेसे वाटते...ती वयाच्या मनाने खूपच परिपक्व आहे...समोरच्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे, मार्गदर्शन करणे...आणि नेहमी हसतमुख राहणे इतके सोपे नाही पण ऋचाला याचे वरदान आहे...हाती घेतलेले काम जनुंकाही एक वसा घेतल्या सारखे ती नेटाने पुढे नेते आहे... ऋचा खरंच आम्ही तुझे खूप ऋणी आहोत...तू आमच्या सारख्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला...आणि लिखाणाची आवड निर्माण करून ती वाढवण्याची स्फूर्ती दिलीस...धन्यवाद ऋचा...
21
Neela Pradhan - (17 March 2023)ऋचाताई म्हणजे उत्साहाचा झरा.उत्कृष्ट मार्गदर्शन व सहकार्य देणारी व्यक्ती.अभिनंदन.
21
जयश्री देशकुलकर्णी - (17 March 2023)सर आपण जे मत शॉपीझन बद्दल आणि ऋचा ताईच्या बद्दल व्यक्त केले आहे त्याला मी पूर्णपणे सहमत आहे. ऋचा खारोखरच खुप सहकार्य देतात. आणि प्रोत्साहन सुद्धा