पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तिचं दुःख

तिचं दुखं
डाॅ. संध्याभराडे 
कधी देव भेटला तर मला विचारायचंय, "कारे बाबा!  असा चेहरा का दिला की जो भेटतो तोच आपलं दुखणं गायला सुरवात  करतो?
तुझं  ठीक आहे रे बाबा युगे अठ्ठाविस कटी वर हाथ ठेऊन  ऊभा आहेस आमचं नाहीं तसं खोटी कां होईना  सहानुभूती दाखवावीच लागते."
 आता हेच बघ ती अग्रवाल म्हणे माझं दुखं फक्त मीच जाणते . साहेब स्वता तर बी.एम.डब्ल्यू. मधे फिरतात मुलाला महागडी बाईक आणि मला आपली तिच खटारा 
मारुती !
चावलाच दुखं फारच मोठं. अमेरिकेला गेले तरं त्या शर्माबाई करता हिऱ्याचा नेकलेस आणला 
अरे मला माहित आहे ती कशी यांच्या  मागे पुढे  फिरत असते.
आणि मिसेस  सराफचं दुखं  म्हणे,  सासु आजारी  सगळं मला करावं लागतं म्हणायला दिर जाऊ सगळे  आहेत  पण काही  सेवा करत नाही आत्ता राम म्हणूदे की येतील  हिस्सा  मागायला.
माझे डाॅक्टर तरं म्हणतात डायबिटिजच्या बायकांचे सुनेशी पटतं नाही आणि पुरुषांचे दुःखं मुलगा  चांगला निघाला नाही किवां  पटतं नाही.
एकदंरित दुःखी तेही आहे ज्यांना मुलं नाही आणि दुखी ते ही आहे ज्यांचे मुलं त्यांना  विचारत नाहीं वृध्दाश्रमात सोय करतात. असे खूप दुखं जगात आहेत. हे सगळं बघून  समर्थानी  लिहलं जगी सर्व सुखी कोण आहे?
पण समर्थ रामदासांचा हा श्लोक ही मला तिचं दुखं विसरु देतं नाही. मला वाटतं समर्थ असते तरं काय म्हणाले असते? की क्षणभर निःशब्द झाले असते जशी मृणालिनी देसाई निशब्द झाली आणि थरथरतं होती.
हरिद्वारला गेली आणि संध्याकाळी एकटीच गंगाघाट वर बसली होती
तिला एक बाई या गुडघ्यावर पाण्यात  उदास  विचार मग्न उभी होती. मृणालिनी हळुच तिच्या जवळ  गेली आणि प्रेमानं खांद्यावर हात ठेवला त्या आकस्मिक स्पर्शानं ती उभी थरारली आणि हातातलं बोचकं पाण्यात पडलं.
बोचकं पाण्यात पडून  प्रवाहा बरोबर  वाहू लागलं  मृणाल नं विचारलं, "काय होतं ग त्यात?"
 "माझं मुल"
"काय?अग ते पडले नं?"
 "ते माझं मुल मेलेलं होतं मी त्याला गंगेच्या सुपूर्त करायलाच आले होते, त्याला  गंगेत प्रवाहित करायचच होतं पण दोन वेळा  बुचकळून वरं काढलं  विचार  करत होते घरी तीन  मुलं अजून आहे ते कापड त्याच्या  बरोबर सोडू की नको? एक मन म्हणतं होतं मुलांना कामास येईल दूसरं मन म्हणतं होतं आयुष्य पडलंय त्यांच अंग झाकायला.. करीन कष्ट पण या बाळा करता हे शेवटचे" आणि धाय मोकलून रडणाऱ्या त्या माउलीचे आश्रु गंगेत मिसळत होते....! आज ही हरकीपौडी वर त्या लाचार आईचे हुंदके  ऐकुयेतात याला म्हणतात दुखं

डॉ. संध्या भराडे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू