पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

खट्टा मीठा

खट्टा मीठा 

मला ना पूर्वी खट्टा मीठा मधला खट्टा म्हणजे खारट असंच वाटायचं...कदाचित ख अक्षरापासून सुरु होतात दोन्ही शब्द म्हणून असेल काय माहीत आणि आपला मेंदू कुठल्या गोष्टी कसा साठवेल सांगता येत नाही. तसंही हिंदी एकंदरीतच 'फारच अफाट' होतं शाळेपासूनच.. त्यात मधली ६ वर्षे मुंबईत राहिल्याने भाषेचा चा दर्जा हिंदी फ वर घसरला होता(नो ओफेन्स, मला तीही हिंदी आवडते) ..पण तिथे अडलं नाही .. .दिल्लीत आल्यावर मात्र मला खरी हिंदी समजली[आणि आवडायला लागली ] असं म्हणायला हरकत नाही.. पहिल्याच दिवशी जेव्हा कामासाठी आलेल्या भाभीना मी विचारलं कि तुम्ही दोन्ही वेळी भांडी घासायला येणार का?..तर त्या "दीदी, जैसी आपकी इच्छा,समय तो है हमारे पास" म्हणल्यावर मी दचकले होते....अय्यो,एवढं कोण अगत्यानं बोलतं??..कमालच वाटली!
दिल्लीत नवी नवी होते तेव्हा माझ्याकडे येणाऱ्या भाभी एकदा म्हणाल्या दीदी, पनीर खट्टा खट्टा सा लग रहा है, खराब है ..मी टोटल बुचकळ्यात ...खट्टा?..रिअली?...अजून तर मीठ घातलं पण नाहीये,डिश बनलीच नाहीये. .....खारट का लागतंय....चाखून पाहिलं तर थोडं आंबट लागत होतं, तरी येडपटासारखं त्यांनाच विचारलं "भाभी, ये खट्टा कहां ...ये तो..ये तो...वो इमली नही होती..उसको क्या बोलते है"...माझी हातवाऱ्यांसकट झटापट सुरु झाली.....त्या म्हणल्या, दीदी, वही मै बता रही हूँ..खट्टा लग रहा है... आणि मग एकदम माझ्या डोक्यात ट्यूब पेटली....अरे हां रे.. खट्टा म्हणजे आंबट... आणि मग खारट म्हणजे काय...ते त्यांनाच विचारलं..त्या म्हणल्या नमकीन!.. येस आता जमली जोडी असं माझं झालं.... तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजे गेली १२ वर्षे माझ्याकडे येणाऱ्या भाभी दीदी लोकांनी माझी हिंदी डिक्शनरी मॅक्स अपडेट केली आहे.. तरी भाजी घेताना...दांडी उडतेच माझी....परवल, टिंडे, तोरई नुसता गोंधळ... असो.
तर न मला एवढं घडाभरून तेल घातल्यावर सांगायचं हे आहे की खूप दिवस काहीतरी सलग लिहावं वाटतं आहे......नक्की काय लिहिणार माहित नाही..पण मनात आलेली आंदोलनं लिहावी असं ठरवलं आणि हे खट्टा मीठा नाव सुचलं...आंबट गोड नाव पण मनात होतं पण खट्टा मीठा माझ्या दिल्लीकरीण स्टेट्स ला जास्त आवडलं म्हणून एवढा सगळा प्रपंच!..तर जमेल तसं लिहीत राहीन.. जमेल तसं नक्की वाचा...अभिप्राय ही द्या..बेक्कार बोरिंग झालं तर तसं सांगा, आवडलं तर तेही सांगा. विषय सुचवा..नवीन रंग ढंग सुचवा...
शब्दांना शब्दांची उबदार शाबासकी च पुढचे शब्द जन्माला घालते....शेवटी मनात हजारो विचारांची पारायणं केली तरी ते सर्व मंथन या हृदयीचे त्या हृदयी दिले जात नाही तोपर्यंत मनातला मोर कितीही थुईथुई नाचला तरी त्याचा मनोपिसारा लौकिकार्थाने एकाकीच फुलतो...हुश्श दमले...खूपच जड आणि मोठं वाक्य लिहून आज आता इथेच थांबते.. परत नक्की भेटू....

सुचेता जोशी अभ्यंकर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू