पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जागतिक दिव्यांग दिन.

माझा लहान मुलगा जन्मा पासुनच दिव्यांग आहे. मन खूप निराश होऊन गेल होत की आपल्याच नशीबी असे का? पण देवाला त्याच्यासाठी मीच योग्य वाटली असेल. तसा तो नाँर्मल मुलांन सारखाच आहे. पण पायाने दिव्यांग असल्यामुळे तो पायाने दिव्यांग आहे. माझा मोठा मुलगा शाळेत जायचा तर हा पण खूप जिद्दपणा करायचा की मला शाळेत जायचे आहे. मोठ्या मुलासारखेच याने पण शिक्षण घ्यावे आणि आपल्या पायावर उभे राहावे असे आम्हाला वाटायचे कारण हा एकपाठी आहे एकदा जर त्याला कोणती गोष्ट सांगीतली की त्याच्या लक्षात राहते आणि असे वाटले त्याने जर शिक्षण घेतले तर लोकांची त्याच्याकडे बघण्याची द्रुष्टी बदलेल कारण  लोकांची द्रुष्टी खुपच खराब असते न . ते त्याच्याकडे खुपच हिन भावनेने बघायचे. माझ्या मनाला खूप दुःख व्हायचे. असो.........

           दिव्यांग शाळांबद्दल कोणत्याच प्रकारची माहिती आम्हाला नव्हती म्हणून मी त्याला नाँर्मल मुलांच्या शाळेत टाकले. पण पहिले शाळेवाले नाही म्हणायचे आणि नंतर घ्यायचे. पण त्रास खूप द्यायचे, म्हणून सारखी शाळा बदलावी लागायची. सर्वच शाळांमध्ये एकच अनुभव आला मला. एका शाळेत माझी मैत्रीण शिक्षीका होती तीने याची अँडमिशन त्या शाळेत करुन दिली. शाळा तशी मोठी होती आणि नावाजलेली शाळा आहे ती पण बाकीच्या शाळेपेक्षा या शाळेत खुपच वाईट अनुभव आला. असे वाटले की या शाळेत अंध, मुकबधीर, आणि दिव्यांग मुले आहोत तर ती शाळा खूप चांगली असेल. या मुलांनकडे स्वतः लक्ष देतील पण तसे काही झाले नाही. शाळेतले मुल नाँर्मल असल्याने याला खुप जास्त त्रास द्यायचे. अगदी त्याला मारायचे,अंगावर पाणी टाकायचे, एकदा तर मुलांनी त्यांच्या कानात गरम खिचडी टाकली होती. आणि त्या शाळेच्या शिक्षीका पण यालाच दोष देत होत्या. म्हणून मी त्या शाळेतुन त्या काढून टाकले. मग............

          डोळ्यासमोर एकच प्रश्न आता काय करायचे. मे फ्लाँवर दिव्यांग शाळेच्या मुख्याध्यापिका माझ्या भावजयच्या ओळखीच्या होत्या. त्याची अँडमिशन त्या शाळेत केली शाळा खुपच छान होती त्या शाळेच्या शिक्षीका पण मुलांकडे स्वताः लक्ष द्यायच्या तीन चार वर्ष तो त्या शाळेत गेला .पण काही कारणांनी ती शाळा बंद  पडली. परत प्रश्न पडला आता काय करायच.पण कोणाला नसले तरी देवाला सर्वांचीच काळजी असते.

              त्याने आम्हाला एक मोठा आशेचा किरण दाखवला आणि तो म्हणजे. स्वीकार संस्था तीथे दिव्यांग मुलांसाठी वर्कशॉप आहे. खुपच छान आहे. तीथे जाऊन तर त्याच्यात खुपच बदल झाला. तिथले शिक्षक मुलांकडे खुपच जास्त लक्ष देतात. सर्व काम मुलांकडून करवून घेतात. मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत घेतात. तीथे मुलांना बागकाम,कागदी पाँकिट कसे तयार करायचे,फिनाईल, तोरण, राख्या तयार करणे,आणि असेच भरपुर काही शिकवितात. तीथे मुलांच्या अँक्टिव्टिकडे पण खूप लक्ष देतात. मुले तिथे जाऊन खुपच आनंदी राहतात. नाँर्मल मुलांनपेक्षा दिव्यांग मुले खूप छान आहे हे अनुभवा वरुन शिकले मी. तीथेले मुले खेळण्यात पण चांगले आहे एक मुलगा तर स्विमिंग चँम्पियन आहे कोणी गाण म्हणतात तर कोणी खूप छान तबला वाजवतात. कोणाचे मन दुखणार नाही याची ते खूप काळजी घेतात.माझा मुलगा घरी असला की सतत तो वर्कशॉपच्याच गोष्टी करत असतो. तिथले सर्वच जण खूप प्रेमळ आणि चांगले आहे. कोणी कोणाला दुखवत नाही. म्हणुनच मुलांचा आशियाना म्हणजे स्वीकार संस्था ही दिव्यांग मुलांसाठी एक मोठा आशेचा किरण घेऊन आली आहे.

        सौ. जान्हवी जोशी.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू