पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तू रंगवेडी

तू रंगवेडी

तू रंगवेडी.....तू गंधवेडी. रंगात माझ्या रंगलेली....दंगलेली. तू गंधलेली....गंधाळलेली....गंधात माझ्या. अशीच राहावी तू कायम हृदयी माझ्या...बनून स्पंदने हृदयाची. वसावीस तू स्वप्न बनून नयनी माझ्या....असावे चित्र तुझेच सदोदित नयनपाकळीवर माझ्या. सजून धजून असावीस तू.....दिसावीस तू कधी छटा बनून नानाविध रंगाच्या.
इंद्रधनू ही मोहून जावा तुझ्या बहरल्या सप्तरंगात जणू....देऊन जावा तुला रंग आपले. तुलाच न्ह्याहळू लागावा तो....लुप्त होऊन नभात कुठंतरी. तू मात्र तुझ्याच तालात.... असावीस बेभान माझ्या सुरात... गुणगुणत काहीतरी...माझ्याचसाठी.
रोजच यावं बहर तुला...बघून मला...घेऊन तेज रंगांचे. आणि बहरत जावीस तू रंगीबेरंगी फुलांपरी....तर कधी फुलांच्या रंगीबेरंगी छटांपरी. अलवार सामावून जावीस तू रंगात फुलांच्या...अन् नकळत माझ्या पण. अशीच फुलावीस तू रोज नवे फुल बनून....उगवावीस तू रोज नवे रंग बनून...रंगीबेरंगी आयुष्यात माझ्या.
कधी दिसाव्यात लालभडक छटा तुझ्यात....त्या लाल प्रीतवेड्या गुलाबापरी. तर कधी दिसावं तुझा अबोला....त्या बहरल्या अबोली गुलाबापरी.
तुला बघून मी फुलावं...बहरावं....धुंदीत तुझ्या. मुक्त विहारावं मी लेऊनी रंग तुझे...जीवनात माझ्या. नवनवे रंग टिपावं तुझे मी....साठवावं मी तुला नकळत नयनी माझ्या. मनसोक्त रंगाव मी...नानाविध रंगछटांत तुझ्या. मोहून जावं मी तुझ्या नशेत.....अन् टेकवावीत अधीर माझे....अधीरपाकळ्यावर तुझ्या. चुंबून काढावं मी तुझ्या नाजूक अंगावरील एकेक रंग.....अन् तुडुंब भिजावं मी रंगभरल्या नशेत तुझ्या. केसांच्या सिंतोड्यातून उडवावीस तू चौफेर रंग माझ्यात. येता बहर रंगाला....लावावं मी रंग तुझ्या अंगाला....अन् अंगही तुझ्या अंगाला. चिंब भिजावीस तू.....उधळलेल्या रंगात माझ्या अन् गुलाबी नशेत.....या प्रीतवेड्या..!
सण हा वसंतपंचमीचा....येति घेऊन रंगपंचमी....उधळाया रंग जीवनाचे. याच रंगात भिजवावं तुला....लावूनी रंग माझ्या आयुष्याचे. करुनी अलवार स्पर्श तुला....भरावं रंग जीवनात तुझ्या मी...हर्ष....आनंद....प्रीतीचे...! बहर यावं मग तुला पण त्या पळस फुलांपरी....तू ही याविस रंग लेऊनी लाल केशरीया आणि भरू लाघावीस रंग तू सृष्टीत माझ्या....अन् भरावीस नकळत तू दृष्टीत माझ्या. भिरभिरावी नजर माझी फक्त आणि फक्त तुझवरी...अन् टिपत राहावं मी नजरेत माझ्या रंग तुझे क्षणोक्षणी. नजर कैद करावं मी तू अन् रूप तुझे वसंतात बाहरल्या त्या नवपालविपरी. तू रंगवेडी...तू गंधवेडी...जावीस सामावून नकळत माझ्या मनी. मी पण घ्यावा विसावा नयनात तुझ्या.....! टिपत बसावा रंग तुझ्या अंगावरील...नाजूक बांध्यावरील.

सत्तु भांडेकर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू