पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

एक धागा सुखाचा

               जीवन हे खूप सुंदर आहे.....फक्त जगता आले पाहिजे. कधी तरी त्या रंगीबेरंगी फुलपाखरांकडे बघा....इवलासा जीव मात्र किती सुखात विहार करतो न...! इकडून तिकडे....तिकडून इकडे मनसोक्त घिरट्या घालत असतो. आपलं आयुष्य एवढं कमी आहे म्हणून कधीच ते रडत पण बसत नाही. दुःखाच्या छाताडावर विराजमान होऊन....मुक्त विहार करतात न ते सुखाच्या वाटेवरती. आपलं पण आयुष्य सुंदर आहे....नश्वर या जगातील. क्षणभंगुर आहे आयुष्य आपलं. दुःखात सुद्धा ओठावर हलकेसे हास्य फुलवले न तर मग बघा जीवन म्हणजे काय आहे....?? 

            सुख ना तर आपण खरेदी करू शकत....ना तर कुणाचे हिरावू शकत..!! सुख ही ईश्वरानी निर्माण केलेली सृष्टीवरील सर्वांगसुंदर संकल्पना आहे. त्याची तुलना आपण पैशाशी करूच शकत नाही. सुख हे शोधून सापडायला ईश्वराची मुरत नाही....!!

झुळूक आहे ते वाऱ्याची फक्त अनुभवून बघावी लागते. सुख हे शोधायचे नसते तर ते जगायचे असते.....आयुष्याच्या रणांगणी..!

शब्दाशब्दातूनी निर्माण करायचे असतात सुख सुरांतुनी. मग आपोआपच ओठांवर स्फुरते गीत आनंदाचे.

                  शिशिरातील पानगळ अनुभवून.....भग्नावस्थेवर करून मात....बहरतो...फुलतो...तो पळस वृक्ष...अगमनात वसंताच्या. एकेक पर्ण गाळून सुद्धा फुलवतात पानगळतीतील वृक्ष ओठांवर हिरवेगार हास्य.....तोच आहे एक धागा सुखाचा. ओठांवर लेऊन लाली....पेरतात रंग आयुष्याचे...फुले ती पळसाची. हेच आहे एक पाऊल सुखाच्या दिशेनी. सूर्याच्या तप्त किरणांवर करून मात.... घेऊन येतो लहर आनंदाची तो ऋतू वसंत...हाच आहे सुख माझ्या नयनपापणीवर वसलेला. आणि आपण सुद्धा जीवनाच्या भग्नावस्थेवर होऊन विराजमान आयुष्याकडे बघितलं ना तर कळेल....की ठोठावतोय दार....सुख आपल्या जीवनाचे. सुख म्हणजे याहून दुसरं असणार तरी काय....?? दुःखातही ओठावरील स्मिथ हास्य बघता पळून जावं दुःख.....तिथंच असते सदोदित वसलेलं सुख...!!

               भयाण अशा काळोखाला जिथं चांदण्याही पूर्णतः दूर सुरू शकत नाहीत न तिथं काजव्यांची काय मजाल...?? म्हणून काजवे काय लपून बसतात का...?? स्वतःपुरता का असेना....पेरतात प्रकाश अन् जगतात जीवन सुखात ते....विराजमान होऊन काळोखावर...! चांदण्यांनाही हेवा वाटावं.... त्या इवल्याश्या काजव्यांचा....हाच असतो काजव्यांसाठी एक धागा सुखाचा...!! अन् आपल्यासाठी पण...आपल्या सकारात्मक ऊर्जेसाठी पण....काय असणार सुख म्हणजे याहून मोठं....??


सत्तू भांडेकर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू