पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

भंवरे ने खिलाया फुल...

*भवरे ने खिलाया फुल!!..*

 

भ्रमराने उद्युक्त करावे कमलदलास..अन ही छेडाछेडी पाहताना मनाने मात्र पिंगा घालावा.. आठवाच्या क्षणांना!!.. असंच काहीसं तू गीत गुलाबी घेऊन आलास..आयुष्याच्या बागेतील तू मात्र भ्रमर होऊन गेलास... तुझी गुणगुण मनाला सदैव साद घालते. अलवार फुलपाखरांसमाने स्पर्शिता ओष्ठपाकळ्या.. अवघे अंग अंग मोहरले..!!

 

आज या कातळ खडकावर बैसुनी मी मात्र तव हृदयात प्रवेश केला. तुझ्या सहवासाचा गोडवा ..इथंच अनुभवला. आपल्या गुजगोष्टी ऐकताना क्षणभर या वृक्ष वेली देखील आपले डोळे मिटून घेत होत्या. तू मात्र अलवार प्रेमपुष्पे मुक्तपणे उधळत होतास..कसं विसरेन मी..? पश्चिमेच्या संध्याछायेतील ते अलवार अलिंगन...!! आज पुन्हा या खडकावर आले की परत ते आठवणींचे अल्बम चाळत रहावे वाटतात..

 

हे मधुबन आपल्या आयुष्याचे नंदनवन करून गेले. येथे वेचलेल्या क्षणांची गणती करायची तरी कशी..!! आपले नेहमीचेच येथे येणे..या मधुबनाला पण प्रिय झालंय. बघ ना! आज एकटीच इथे आलीय तर भ्रमर कसा उल्हासीत झालाय. दूरवर फिरणारी रंगीबेरंगी फुलपाखरे आनंदून गेलीत आणि मजकडे डोळे मिचकावून जणू विचारतात.."आज एकटीच.??"

 

काय सांगू मी त्यांना..? अस्सं डोकं उठवलंय यानी..थांब आता तौ

तुझाच नंबर देते यांना अन् सांगते तुम्हीच विचार.. खरं तर तुला घेऊनच यायचे होते पण तुझी कार्पोरेट मिटींग म्हणजे अगदी फर्स्ट प्रिऑरिटी..कधी आलायसं वेळेवर..

 

पण काही नाही ..नजरेनेच खूणाऊन सांगितलंय या भ्रमराला..अगदी तू येईपर्यंत थांब थोडं.. एका हाताने त्या मावळणार्या दिनकराला धरून ठेवलेय..अरे नको ना करू अंधार.. येऊ देत माझ्या प्रकाशाला मग जा निवांत विश्रांतीला. तो ही तुझीच वाट बघतोय. किती अंत पाहशील.. बटाट्यासारखे डोळे असणार्या तुझ्या बाॅसच्या टकलावर दोन टीमक्या वाजव अन् ये निघून..

 

आकाशातील गडद निळाई आज सरोवरातील पाण्यात प्रतिबिंबित झालीय पहा कशी.. जणू आज अंबरच तारकांचा साज लेऊन या पाण्यावर अलगद तरंगतय..हे मनोहारी दृष्य पाहताना माझा माथा तुझ्या खांद्यावर हवा होता.

 

 

श्रीकांत दीक्षित.

8805988172

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू