डे च फॅड
#‘डे' च फँड...#
आमच्या कडे मदर्स डे,फादर्स डे मानले जात नाही..
आईला ये आई आणि बाबानां अहो बाबा म्हटल्या शिवाय राहत नाही..
आई आणि बाबा असतात प्रेमाची नि त्यागाची मुर्ती..
त्या का असतात वन डे च्या ऊत्सव मुर्ती..
चार भावंडं नि आई बाबा षटकोनी परिवार आमचा..
घरी कायमच भरतसे ऊत्सव नात्यांचा..
लहानपणी जी शिकवली धुळाक्षरे चार...
आजही उपयोगी येतात तेच संस्कार..
आईने छकुला नि बाबांनी कारट्या म्हटल्यावरच उगवे सकाळ...
गुरूजींचा ,बाबांचा हस्तप्रसादा शिवाय सरत नसे संध्याकाळ...
आर्थिक झोळीला छिद्र होती फार..
प्रेम माया आपुलकीचं अप्रूपच फार..
घरात नव्हते कुठलेही शिष्टाचाराचे वेदर..
रोज रात्रीच्या जेवणालाच होई घरचे गेट टुगेदर..
आईची असे विचारपूस बाबां घेती समाचार..
अमोलिक कष्टानेच जीवनाला आला आकार..
मागे एकदा बाबा बोलत असता कुणाशी शब्द कानावरूनी गेले...
गुणवान मुलं ती माझं नाव काढले...
परिस्थिती पुढे हातच थोकडे पडले...
नाही पूरवले लाड,नि चिमण चोचले.
पहिल्यांदा बाबांचे कौतुकाचे शब्द ऐकले...
ऐकोनि माझे हृदय हेलावले,डोळ्यातून आसु खळकन टपकले....
आई बाबांच्या ऋणाला परतफेड नाही...
आमच्या कडे मदर्स डे, फादर्स डे मानले जात नाही..
© नंदकुमार वडेर.
99209 78470.
‘’
