पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आईच्या अंगाईची शेवटची ओळ..

"जो जो रे बाळा 

बाळा जो जो रे.. "

आईची अंगाईची  शेवटची ओळ 

मला अजून ही जगण्याला साद देते 

जेव्हा मला झोप येत नाही तेव्हा याच अंगाईगीताने  माझी झोप शांत होते. आम्ही चार भावंडे पण जीव मात्र माझ्यावर.रात्री उशिरा झोपायची आणि पहाटे लवकर उठून सडा रांगोळी काढायची. दिवाळीच्या वेळी भल्या मोठया रांगोळ्या काढायची.तिचे कौतुक ही व्हायचे. पण कधी मी दमली,  कंटाळले असा शब्द तोडांत येत नसे.मी लग्न होऊन सासरी आले तेव्हा 'आई होणे' 'आईपणाची जाणीव 'मला झाली. जसा त्रास मी आईला तसाच त्रास माझी मुलगी मला देते. अगदी प्रत्येक गोष्टीसाठी बालहट्ट.तिला आवडली नाही की दुसरी मागवते. अगदी माझेच बालपण आठवते.... .   

."आई मायेचा सागर 

तिला अश्रूंची किनार

 सुखदुःखे झेलती 

किती यातना अपार"..  

माझ्या प्रत्येक हालचालीवर  तिचे बारीक लक्ष. सतत अभ्यासात मग्न मी जेवत नाही तोपर्यंत ती उपाशी.जाग्यावर बसून ज्यूस, घावन सर्व काही मिळायचे. मला कोणतीही गोष्ट आवडली नाही की लगेच दुसरी मिळायची.तिला चित्रपट पाहण्याचे खूप वेड. आवडीला सवड काढली नाही. तिला मधुबाला,  नर्गिस,  देवानंद यांची जुनी गाणी 'दोस्ती 'पिकचर तिचा फेवरेट.. स्वतःसाठी कधी वेळ काढला नाही मराठी व्याकरण तिचे  एकदम परफेक्ट. मराठी व्याकरणाचे निबंधआम्ही  तिच्याकडून लिहायचो. आणि हे संस्कार मी माझ्या मुलांना दिले.जेव्हा जेव्हा ती आठवण काढते तेव्हा मला उचकी लागते... 

पण आता ती थकली वडील गेल्या पासून अगदी एकटी पडली. सतत एकटी स्वतःला समजावत जगते. मलाअजूनही  चारोळी पत्र लिहते  त्यातही तिच्या कविता पण 'ममत्व' जास्त.. मनातल्या भावना अलगद कागदावर उमटवते.. मन अगदी अश्रूंच्या ओलाव्याने भिजते . आज जेव्हा कधी मी माहेरी जाते तेव्हा मला झोपवल्याशिवाय ती झोपत नाहीआणि परमेश्वराची भक्ती मी तिच्यात जागृत केली सतत देवाची माळ आणि नामस्मरण करत ती..  

*जो जो... करत मलाही लांबून झोपवत राहते माझी माय* 

✍️..विद्या जगताप ❣️ 


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू