पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अभिमान स्त्रीत्वाचा

नवरात्री हा माझा अगदी लहानपणा पासून आवडता सण,खरं तर दर लहान मुलीचा हा आवडता सण असतोच, कारण कसं आहे ना कि  तो एकच नऊ दिवसाचा काळ असतो जेव्हा मुलीला आपल्या स्वतःच्या स्त्रीत्व चा आणि मुलगी आसनाच्या अभिमान वाटतो, समाजात सर्वच घरात मुलींना बोलवून तेंच्या पूजा सत्कार केला जातो म्हणजे थोडक्यात मुलीला देवतुल्य स्थान मिळते.पण आज ज्या विषयावर मी आपले विचार मांडते आहे तो हा प्रश्न कि कां फक्त ते नऊच दिवस मुलीला अभिमान वाटतो?  कां तिला नेमही प्रश्न पडतात कि मुलगी असणं काही तरी चुकल्या सारखं आहे ? कां तिला नेमही काहीतरी कमी जाणवते? कुठेतरी काहीतरी चुकत आहे ज्यामुळे आमच्या समाजतल्या पन्नास टक्के भागाला म्हणजेच स्त्रियांना अगदी रोज काही ना काही प्रश्न पडतो ज्यामुळे तिला विचार करावा लागतो कि मुलगी असणं किव्हा स्त्री असणं  म्हणजे काही तरी कमी पडणं, काहीतरी कमीपणा जाणवतं आहे.

मी मुलगी असून हि माझ्या कुटुंबा नि मला अश्या   प्रश्नापासून दूर ठेवणाच्या खूब प्रयत्न केला पण या समाजात  मला असे बरेच प्रश्न पडले, त्यातले काही प्रश्न इथे मांडते.माझं बालपण म्हणजे आजी आजोबा, आई 'पपा  आणि आम्ही तिघी बहिणींचा सुखी कुटुंब ( हो सगळं बरोबर आहे तिघेही बहिणी , भाऊ नाही आणि तरीही सुखी कुटुंब). आई वडलांनी इतक्या प्रेमानी वाढवलं कि कधी काही कमी जाणवली नाही .पण ह्या समाजाला आमच्या कुटुंब मध्ये सदाच कमी जाणवत होती आणि ती कमी जाणवून द्याचा प्रयत्न सुद्धा ते सदा करत होते

 

आठ वर्षाची होते , मैत्रिणी कडे अभ्यास साठी गेले, तिच्या आजी नी सहज विचारलं किती भाऊ बहिणी तुम्ही, मी सांगितलं आम्ही तिघी बहिणी , दुसरा प्रश्न लगेच आणि भाऊ?? मी म्हंटल भाऊ नाही, तिच्या आजी चा चेहरा वर अगदी सहानुभूती चे भाव होते . मला तेंनी जाणवून दिला कि काही तरी कमी आहे.

 

एकदा मामा कडे जेवायला गेलो, मामी खूब प्रेमळ आहे माझी, गप्पा गोष्टी करताना सहज म्हणाली कि ती स्वतः खूब नशीब वन आहे ती म्हणाली कि तिला दोन पोर आहे आणि दोघे हि मुलं आहे , मला प्रश्न पडला कि मुली असणारी आई नशिबवान नाही का?

 

वय वाढत गेलं , आणि माझ्या आवडत्या सणाला म्हणजेच नवरात्री ला आई नी सांगितलं कि आपलं घर लहान आहे , म्हणून महिन्याची पाली आल्यावर नवरात्रीच्या काली मामी काढे जायचं कारण काय कि दुर्गादेवी चा सोल कडक असत.ज्या सणाला मला लहानपणी आपल्या स्त्रीत्व चा अभिमान वाटायचा, त्याच सणाला या वर्षी मला मोठा प्रश्न पडला कि स्त्रीत्व आणि मातृत्व करता गरज असणारी महिन्याची पाली देवीला चालत नाही असं कां ?

 

माझ्या शेजारी एक ठाकूर कुटुंब राहायला होते त्याचे चार मूळ होते , एकही मुलगी नाही, तेंच्या मोठ्या मुलाचं लगण झालं , एका वर्षात नवीन सुनेला दिवस राहिले आणि मुलगी झाली, मी भिंतीच्या माघु ऐकलेले कि त्या काकू कोणाला   सांगत होत्या कि आमच्या घरात कधीच मुली होत नव्हत्या, शेजारच्यांनी छाया पडली वाटत.मला मोठा प्रश्न पडला कि कधीच  घरात मुलगी ना असणं हा वरदान आहे कि श्राप ?

 

मुलींच्या आणि स्त्रीच्या अधिकार साठी बरेच मोठे मोठे प्रश्न आहेच , मुलींची स्वतंत्रता, सुरक्षा, सामान अधिकार पण मला असं वाटत कि हे मोठे प्रश्न स्वतःच सुटतील जर असे छोटे छोटे प्रश्न जे मला पडले आणि आमच्या समाजातल्या दर मुली ला पडत असतात त्याचे उत्तर शोधले गेले. खरतर ह्या प्रश्नाचे चे उत्तर काही कठीण नाही आणि  फक्त सामाजिक विचारधारा बदलण्यावर अवलंबून आहे

 

मी लहान असताना मी माझ्या आजोबाना नेहमीच दुर्गा सप्तशती चे पाठ करताना बघितले होते, एका नवरात्रीला मीही विचार केला कि मी दुर्गा सप्तशती वाचून बघेन. जेव्हा आम्ही कुठलीही पुस्तक किव्हा साहित्य वाचतो त्याच्यातली व्याख्या आणि अर्थ वाचक च्या अनुभव आणि बुद्धी श्रमतें वर अवलंबून असतो. दुर्गा सप्तशती वाचल्यावर मला बरेच उत्तर सापडले , मला आपल्या स्त्रीत्वाचा गर्व  निर्माण झाला, आई दुर्गा नी दाखवून दिल कि स्त्री जितकी सौम्य असते तेव्हडीच शौर्यवान असते, जितकी सुंदर असते तितकीच भयंकर पण असू शकते, आणि जितकी शांत आणि प्रेमळ तितकीच रागिष्ट  आणि सूद घेणारी पण असू शकते.

 

मला दुर्गा सप्तशती वाचून कळलं कि अर्धज्ञान ठेऊन अर्थाचा अनर्थ करून आपला समाज रूढीवादी विचारधारा बगळतात. ज्या देवींनी राक्षसाचं संहार केला ,रक्त स्नान  केलं , मांस , अंगभंग आणि भयावह द्रिश्य बघितले आणि निर्माण केले, त्या देवीला कसला आला आहे महिन्याचा पाळीचे चमचे रक्ताचा तिरस्कार, हे सर्व विचारधारा अर्धज्ञान आणि रुढिवादित आहे अजून काही नाही.

मी या लेख च्या माध्यम नी आज हेच अनुरोध करेन कि चला यावर्षी नवरात्री ला देवीची पूजा करताना हे प्रण घेऊ कि जस लहानपणी आम्ही मुलींना ना देवीस्थान देतो, जस गौरव आम्ही प्रदान करतो, तसंच गौरव आम्ही मुलींना आणि स्त्रियांना आयुष्यभर प्रदान करू. चला आम्ही असं समजाचे निर्माण करू जिथे फक्त नवरात्री चे नऊ दिवस नाहीतर मुलींना आयुष्यभर आपल्या स्त्रीत्वाचा अभिमान वाटेल.

 

 

सौ तृप्ती दांडेकर हुमनेकर

 

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू