ग. दि. माडगूळकर स्मृति दिनानिमित्त
आज ग.दि.माडगुळकर स्मृतिदिन त्या निमित्ताने *वाटेवरल्या सावल्या* या पुस्तकाबद्दल थोडेसे ....
ग. दि. माडगूळकर म्हंटल की गीत रामायणासारखी भावसंपन्न आणि प्रासादिक , मराठी मनांना मोहिनी घालणारी रचना डोळ्यापुढे येते. महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ????????.वाटेवरल्या सावल्या हे पुस्तक जसे हाती आले तसे अक्षरशः झपाटल्या सारखे वाचून काढले.
खरं सांगायच तर ह्यात त्यांच सपुर्ण आयुष्य अधोरेखित झालय अस म्हणता येणार नाही पण गदिमा नावाची एक प्रतिभेचे लेणे घेऊन आलेली माती त्या संस्कारात लेखक, देशभक्त, कवी, कथकार, नट म्हणून त्यांचा झालेला प्रवास मनाचा ठाव घेणारा आहे हे निश्चित..खरं सांगायच तर सुमारे २५/३० वर्षांपूर्वी वाटेवरल्या सावल्या हे आत्मवृत्तपर लेख मनोहर मसिकतून क्रमशः प्रसिद्ध होत होते. त्यांचच आनंद अंतरकर यांनी केलेले हे संकलन. ह्या आत्मचरित्रात निवेदनाच्या ओघामध्ये गदिमांनी स्वत:च्या मातुश्री, मा. विनायक, आचार्य अत्रे, बाबुराव पेंढारकर, वि. स. खांडेकर , बाबुराव पेंटर, बाबुजी म्हणजेच सुधिर फडके आदी व्यक्तिरेखा सहज आणि रंजक शैलीत रेखाटल्या आहेत. गदिमा हे साहित्य-संस्कृती तले झपाटलेले झाड होते. या झाडाने अनेक ऋतु , वादळे झेलली. ह्या सगळ्या संकटातूनही तावुन सुलखून हे झाड ताठ उभे होते. असीम दारिद्य आणि कष्ट ह्यावर मात करुन त्यानी साहित्य आणि चित्रपट सृष्टीत एक वैभवशाली पर्व निर्माण केलं. ती समृद्धी अपण सगळेच अनुभवतो आहोत.
तसं पाहिलं तर हे अपूर्णही म्हणता येणार नाही. एका मनस्वी कलावंताचा अंधार छेदून प्रकाशाकडे झालेला हा प्रवास.. वाटेवरल्या सावल्या तुम्हाला सुखद छाया देतील ह्यात शंकाच नाही. प्रत्येकानी आवर्जून वाचावी अशी ही आत्मकथा!!
दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती ????????????????
©️®️ अश्विनी परांजपे - रानडे
