पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जागृत वैभवशाली भारत

जागृत वैभवशाली भारत            

 

                               अमेरीकेतील प्रवासात मिशिगन विघापीठात स्वामी विवेकानंद पत्रकारांना सांगतात आहे, ‘हे शतक तुमचे असले तरी ऐकवीसावे शतक भारताचे आहे.’ स्वामीजींच्या विचाराने हिंदुस्थानाला आत्मनिर्भतेकडे घेवून जाण्यास प्रवृत्त केलेले आहे. सर्वच क्षेत्रात आम्ही आता आत्मनिर्भरतेकडे वळलेलो आहे. त्यामुळे स्वदेशी उत्पादनात आमच्या देशाने उचांक गाठला आहे हि बाब स्वाभाविक आहे. हा देश अखंड राहीला पाहिजे त्यासाठी काश्मीरला वेगळा दर्जा असलेले घटनेतील ३७० कलम नष्ट केले. शत्रुला सर्जिकल स्ट्राईक व्दारे धडा शिकवला. दहशतवादी घटनांची संख्या कमी झाली. भारताच्या स्वातंत्र अमृत महोत्सवाने देशात घरोघरी राष्ट्रध्वज स्वातंत्रदिनी फडकविल्याने देशप्रेम जनतेच्या मनात निर्माण केले. राष्ट्रीय एकात्मतेची भावना एकवटीली तर देशावरचे सर्व विघ्न पळू लागतात. पूर्वीची परीस्थिती देशाची काय असली पाहिजे युरोपीय देशांकडून मदत मागायची सवय झाली असतांना देशाचे स्वतत्व गुलामीत ठेवल्यासारखे वागणारे पुढारी आम्ही पाहिले होते. अंधश्रध्दांळूचा देश, गुलामांचा देश म्हणून हिनवल्यात जात असे. आमच्या देशाचे पुढारी मात्र पाश्चात्यांनी सुडबुध्दीने तयार केलेला इतिहास भारतीय तरूणांच्या मनी ठासण्याचा प्रयन्त करीत होते. सत्ता सांभाळीत होते. भारताच्या स्वदेशी आणि स्वावलंबनाच्या संकल्पना फक्त कागदावरच राहील्या होत्या. आजचा भारत आत्मनिर्भरतेच्या मार्गावर मार्गक्रमण करीत आहे. त्यामुळे जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे हे एकवीसावे शतक भारताचे आहे स्वामीजींची स्वप्नातला वैभवशाली जागृत भारताचे निर्माण होत आहे. यासाठी सर्व स्तरातून आवश्यक प्रयत्नही होत आहे.

 

                              स्वामी विवेकानंद हे सांगतात, ‘‘भारतीय बंधूनां परस्पराचे गुणग्रहण करावयास शिकविणारी, परस्परांना साहाय करावयास शिकविणारी संघटना फार आवश्यक आहे. माझया अमेरीकेतील कार्याविषयी आनंद व्यक्त् करण्यासाठी कलकत्त्यात योजलेल्या सभेत पाच हजार लोक आले होते. अन्य गावी शेकडोची उपस्थिती होती. हे ठिकच आहे. पण आपल्या माणसापैकी प्रत्येकाला ‘‘तु एक आणा दे’’ असे म्हटले असते तर कितींनी तो दिला असता? आमच्या सर्व देशाला दुस-यावर अवलंबून राहायची सवय आहे. घास त्यांच्या तोंडापर्यत आणूल दिला तर ते आनंदाने खातील. पण काही जण असेही म्हणतील की, ‘आम्हाला भरवा हो’! तुम्ही आत्मनिर्भर होऊ शकत नसलात तर तुम्ही हया जगात जगण्यास नालायक आहात.’’ स्वामीजी भारतीयांच्या डोळयात झनझणीत अंजन घालीत आहे. देशाला स्वामी विवेकानंदांच्या मनुष्य निर्माण विचारांची आजच्या परीस्थतीत भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी आवश्यक आहे.

 

                           भारतीयांना जागृत करतांना स्वामीजी म्हणतात, ‘‘आधुनिक भारतीयांनो, मोहमायेतुन जागे व्हा! ते कसे व्हायचे याचा मार्ग आपल्या अध्यात्मिक ग्रंथामध्ये आहे. आपल्या मुळ स्वरूपाचे ज्ञान करून घ्या. इतरांना करून दया. आपल्यातल्या सुप्त शक्तीला आवाहन करा. ही सुप्त आत्मशक्ती जागृत कार्यशक्तीच्या रूपाने प्रकट झाली म्हणजे प्राप्त होणार नाही असे काय आहे? सामर्थ्य येईल वैभव येईल, सदगुण येईल, शुचिता येईल! जे उदात्त, उत्तम, उन्नत आहे.’’ स्वामी विवेकानंदांनी आपले संपूर्ण तेजोमय जीवन मनुष्यं निर्माण करीता समर्पित केले आहे अर्थात मनुष्य निर्माण म्हणजेच आत्मनिर्भर भारत होय. आम्ही ईतिहासचे पानांची उकल केली तर असे दिसून येईल की, सन १८५७ च्या स्वातंत्र समरानंतर सर्वात महत्वाची घटना घडली असेल तर ती म्हणजे ११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागो येथे धर्मसभेला केलेले उदबोधन होय. समस्त भारतीय जीवन दर्शन, संस्कृति आणि सभ्यता ही विश्व पटलावर त्याचे दर्शन ओजस्वी वाणीने मांडले त्यामुळे भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलविण्यास भाग पाडणारा योध्दा संन्यासी स्वामी विवेकानंद यांनी भारताच्या विश्वधर्म ची मानव कल्याणाचा विचार हिंदुस्थानाचा विश्व कल्याणाचा विचार आहे. भारताचा विचार प्रगट केला.

 

                         आत्मनिर्भर भारतासाठी आम्ही पहिले पाऊल उचलले पाहिजे की, आम्ही आपला गौरवशाली ईतिहास स्विकारला पाहिजे त्यामुळे आमच्या भारताच्या युवकांमध्ये आत्मविश्वास जागृत होईल आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग देखील प्रशस्त होईल. भारताला आत्मनिर्भरचे पाऊल उचलतांना पाश्चात्याचे अंधानुकरण थांबविले पाहिजे, पाश्चात्य युरोपीय ज्ञानाचा उपयोग भारताच्या आत्मनिर्भरतेसाठी भारतीय विचार तत्वानुसार उपयोग करता येईल. पाश्चत्यांचा झगमगाटाला भारवून आपला देश आत्मनिर्भय होणार नाही. स्वामीजी म्हणतात, ‘‘एकी कडे नवा भारत म्हणतो आहे, पाश्चात्य भाव, पाश्चात्य भाषा, पाश्चात्य आहार आणि पाश्चात्य विचाराने आपला देश पाश्चात्य देशाप्रमाणे शक्तीशाली होवू शकेल, दुसरीकडे प्राचीन भारत म्हणतो आहे, हे मुर्खा! परकीयांची नकल केल्याने परकीयांचा भाव आपला होवू शकतो? सिंहाचे रूप घेवून गाढव कधी सिंह होईल? नाही! म्हणुनच भारतीय समाजाला भारतीय विचार तत्वाच्या आधारवरच मार्गक्रमण करावे लागेल.’’

 

                            आपल्या भारतवर्षावर जेव्हा परकीयांची एकामागोमाग अनेक आक्रमणे झालीत आणि परकीय सत्ता दिल्लीत सत्ताधीश झाली, तेव्हा भारतीयांचा पराक्रम लोप पावला, आपआपसात वैमनस्य वाढले. चांगल्या वाईटांचा विवेकही नाहिसा झाला आणि सगळया गुणांची माती झाली. आम्ही गुलाम आहोत, आम्ही दुर्बल आहोत, आम्ही फक्त सेवेचे अधिकारी, राज्य करावे तर परकीयांनीचं! असा भाव सगळीकडे उत्पन्न झाला. याचा परीणाम असा झाला की, धर्म संस्कृति, विघा, कला, पराक्रम, युध्दकौशल्य, राजनीतीचातुर्य आदि सर्व विषयात पराकोटीचा निम्नस्त्र असलेल्या परकीयांनी आपल्या देशात शेकडो वर्षे राज्य केले. भारतीच्या उन्नतीचा प्रबुध्द मार्ग आम्ही हरवून बसलो. भारताच्या स्वातंत्रानंतर ही पाश्चात्य विचारांच्या गुलामीचे मानसिकतेचे भूत मात्र तसेच बसून राहीले. परकीय इंग्रज भारताच्या समोरच्या दरवाज्यातून गेले आणि मागच्या दरवाज्यातून विदेशी कंपन्यांची भरमार देशात होवू लागली त्याला कारणीभूत होती ती आपली इंग्रजाळलेली परकीय गुलामीची मानसिकता. ही गुलामीची मानसिकता भारतीयांनी झुगारून टाकावी यासाठी महान तत्ववेत्ता स्वामी विवेकानंद यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातली होती.

 

                वर्तमान काळात धर्मनिरपेक्ष वादाचा उदो उदो करीत देशात ढोंगी धर्मनिरपेक्षतेचा मोठा गोंधळ माजला आहे. धर्मनिरपेक्षता हे स्वातंत्र, समता, बंधुता या तत्वाचा परस्पर अवरोध निर्माण करणारे असून धर्माशिवाय राष्ट्र निर्मिती शक्य नाही. राष्ट्र हे बलशाली स्वातंत्र, समता, बंधुत्व या त्रिसुत्री शिवाय शक्य होत नाही. गेले कित्येक वर्ष हे राष्ट्र गुलामीत कां गेले? याचा शोध घेतला असता देशात धर्म होता परंतु स्वातंत्र, समता, बंधुत्वाची संकल्पना जनमानसात रूजलेली नसल्याने हे राष्ट्र गुलामीत होते. धर्म होता म्हणुन राष्ट्र होते अन्यथा ते ही लयास गेले असते. त्यामुळे आपले प्राचिन राष्ट्र धर्म विरहीत राहु शकणार नाही. देशाची प्राचिन धर्म संस्कृति राष्ट्राचा प्राण आहे. स्वामीजी म्हणतात, '' धर्म अशी वस्तु आहे की, जिच्यामुळे पशुचे मनुष्यात आणि मनुष्याचे ईश्वरात रूपांतर होते.''

 

                             स्वामीजी म्हणत असत की, धर्म हेच आपल्या जीवनाचे सारभूत तत्व आहे. हिंदुस्थानाचा प्राण आहे. आपण जर भारतीय मुल तत्वा पासुन मागे गेलो तर तीन पिढयात आमचे अस्तित्व संपून जाईल. घोर गुलामीच्या काळातही आम्ही आपला धर्म आणि संस्कृतिचा प्रकाश प्रज्वलित ठेवला आहे. संत,सत्पुरूषांनी या भुमीवर जन्म घेवून भारतीय विचारांना तेजोमय ठेवण्याचे महान कार्य केले आहे. राष्ट्रावर असिम प्रेम आणि त्याच्या उत्थानाची तीव्र इच्छा यांच्या पोटीच स्वामीजींनी या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. म्हणूनच आपण त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. स्वामींचा स्पष्ट इशारा आहे की, आपण धर्माची उपेक्षा करू, तर तीन पिढयांतच नष्ट होवून होवून जाऊ. म्हणूनच राष्ट्र जीवनात कार्य करतांना अध्यात्मिक अधिष्ठानावरच राष्ट्राचे पुनरूज्जीवन करावे लागेल. स्वामीजींचे विचार विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, व्यापारी, गरीब-श्रीमंत,दलित, पीडित, शोषित, महिला, वैज्ञानिक, हिंदू, अहिंदू, आस्तिक, नास्तिक,प्रस्थापित, विद्रोही किंबहुना सर्वच स्तरांतील माणसाला आपलेसे करून त्याची उन्नती साधणारे आहेत आज अनेक शक्ती देशाच्या श्रद्धास्थानांवर आघात करण्यासाठी सरसावल्या आहेत.धर्मांतरण, जिहाद, आत्मविस्मृती यासारख्या काळ्या ढगांमुळे देशाचे क्षितिज काळवंडले आहे. अशावेळी ‘मला काय त्याचे?’ या स्वार्थी मानसिकतेतून समाजाला बाहेर काढण्यासाठी राष्ट्रप्रेमी युवकांनी देशकार्यासाठी पुढे येवून विधायक कार्याची गरज आहे. या राष्ट्राची हानी दुर्जनांच्या दुष्टतेमुळे झाली त्याहून अधिक ती सज्जनांच्या निष्क्रियतेमुळे झाली, असे थोर विचारवंत आर्य चाणक्य म्हणतात. सज्जन शक्तीला संघटित आणि सक्रिय होण्यासाठीच्या प्रेरक शक्तीचे नाव आहे स्वामीजींचे विचार. विस्तार हेच जीवन अन संकुचितता म्हणजे मृत्यू. आपल्या दैनंदिन व्यवहारीक जीवनात आपण स्वामीजींच्या उपदेशानुसार समाज जीवनात आचरणात आणू या. विश्वातील प्रत्येक राष्ट्राचे ध्येय निर्धारीत असते. आपल्याला वैभवशाली जागृत भारत निर्माण करायचा आहे. प्रत्येक भारतीयांची मनात माझा भारत ही भावनेचे जागरण करण्याची आवश्यकता आहे. देशाला परम वैभव प्राप्त कार्यासाठी समस्त युवकांनी झोकून दिले पाहिजे. आपण एकात्मतेच्या भावनेने धर्म, जीवनाची विशुध्दता आणि अंतीम सत्याची अनुभूती, भारतीय शिक्षण पध्दतीच्या आधारावर भारतवर्षाला शक्तिशाली, आत्मनिर्भय आणि सुसंघटित करूया.                    

ही माय थोर होईल। वैभवे दिव्य शोभेल

जगतास शांति देईल। तो सोन्याचा दिन येवो  

अमोल तपासे,

सीताबर्डी,नागपूर.

९९६०६७३७८९

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू