पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अवकाळी पाऊस

//  अवकाळी पाउस..//

 " येरे येरे पावसा 

तुला देतो पैसा 

पैसा झाला खोटा 

पाउस आला मोठा "

अस म्हणुन पावसाला लहान मुल डिवचत असत .. मग पाउसही  त्यांच मन राखण्यासाठी मोठा दिलदार पणे येत होता.. पाउस आल्यावर जे पाणी रस्त्याने वाहात असे त्यात कागदाच्या छोट्या छोट्या नावा करून त्यात सोडुन देत असत .. ती नाव पण मोठ्या डौलान त्या पाण्या सोबत वहात जात असे .. ती नाव  वाहताना बघुन चिमुकल्या च्या चेहयावर आनंद मावत नव्हता ..

काय तो आनंद .. 

काय ती नाव.. 

काय तो  ओढा..

काय तो नाला..

सर्व कस एकदम ओ. के..

असा बरसणारा पाउस मनाला ..

जिवाला ..

तनाला..

सृष्टीला...

आनंद देउ न जात असे .. त्यामुळ निसर्गाची.. हि र वी शाल पांघरली

निसर्गाचे सौंदर्य अधिकच खुलत... असा हा पाउस ..

मना मनावर कोसळतो...

मनातील मळ पार धुउन टाकतो..

पण .. का कोणास ठाउक..

काळ बदलला .. निसर्ग चक्रा प्रमाणे येणारा पाउस .. आताशा कोसळतच नाही ...

ज्या पावसाची वाट आपण चातका प्रमाणे बघत असतो तो पाउस आता .. कोसळतच नाही..

पावसानेही आपले रूप आता ..

बदलेले आहे.. उग्र रूप धारण केले आहे .. त्याच नामकरण

" अवकाळी पाउस".. म्हणुन ओळखल्या जाऊ लागला..

या अवकाळी पाउसाचे विभत्स

रूप सर्वासमोर आले...

मेघ गर्जने सह... अकांडताडव करत ... गडगडाटा सह... अवकाळी पाउस येत ... असतो 

या अवकाळी पावसाच रूप सुद्धा ओंगळवाण असत... कोणाचीही फिकिर  ...तमा ..  काळजी न करता.. बेभान पणे कोसळत असतो .. कोसळत च असतो...

एवढा कोसळतो कि ढगफुटी झाली कि काय .. अशी शंका...

यावी.. या प्रचंड ... आणि .. महाकाय.. लाटेत .. अनेकांची ..

स्वप्ने.. व हात वहात ... गेली..

हातातोंडाशी आलेला घास ... ओरबाडल्य गेला.. अनेक पिकाच नुकसान .. अनेक फळबागाचे नुकसान .... नुकसान .. नुकसानच . या एका पावसाने

नव्हे ... अवकाळी पावसाने ..

शेतकर्याच्या डोळ्यातील पाउस . थांबायच नाव घेत नाही..

." पाऊस कोसळत जातो..

कोलंबसी स्वप्नाची पडझड करत

वाहात जातो काळाचा प्रवाह..

स्वप्नाची पडझड करत..."

पाउस ही आजकाल बेइमान झाला आहे म्हणे...

जेव्हा कोसाळायच ते व्हा 

कोसळत नाही...

नको तेव्हा

नको तिथ

खुप खुप कोसळतो

होत्याच नव्हत करून टाकतो..

पाउस असा कोसळावा..

प्रत्येक मन कोरड करून जाव..

आजकाल ऋतुही बेइमान....

झाला आहे म्हणतात...

असा अवकाळी पावसाच

रूप खूप भयानक ..

अक्राळ विक्राळ आहे...

नको तो अवकाळी..

नको ते नुकसान..

नको ती डोळ्यांना लागलेली 

अखंड धार..

नको ते नुकसान..

हे नुकसान कधीही भरन्न 

निघणार नाही ..

तेव्हा हे अवकाळी पावसा तु कधीही येड नकोस आणि आमच नुकसान करू नको..

तु मानान ये

आम्ही तुझ स्वागत करू ...


        श्रीकांत धारकर

           बुलडाणा

        ९०११०२३१९८

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू