पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जगातील पहिले वृक्ष संमेलन

जगातील पहिले वृक्ष संमेलन

????झाडाचे गुण गाऊ,झाडाचे गुण घेऊ????.... या संदेशातून सयाजी शिंदे जी व अरविंद जगतापजी यांच्या संकल्पनेतून साकारलेले एक सुंदर आगळे वेगळे 13 व 14 फेब्रुवारीला सह्याद्री देवराई, पालवण (बीड) येथे पार पडलेले जगातील पहिले "वृक्ष संमेलन" निसर्गाच्या सानिध्यात गावातून दिंडी-पालखीतुन असंख्य जनसमुदायाच्या साक्षीने अनोख्या पण सुंदर तऱ्हेने सुप्रसिद्ध मान्यवरांच्या सहवासात संपन्न झाले. त्यात निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनासाठी विविध माध्यमातून अगणित लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. या वृक्ष संमेलनात अनेक प्रकारच्या तज्ज्ञांची माहितीपर व्याख्याने, एका सुरेल सुंदर चालीतून वृक्षसंमेलनाचे कानाला मंजुळ अन मनाला खूप भावुन जाणारे असे गीत सतत लक्ष वेधून घेत होते व नकळतपणे सर्वांच्या ओठी सतत गुणगुणत होते. या संमेलनाच्या उपक्रमात अनेक छोट्यामोठ्या गोष्टींचा समावेश होता व सर्वात महत्वाचे म्हणजे सयाजी शिंदेजींनी व अरविंद जगतापजींनी सर्वत्र खूप खेळीमेळीचे व आपलेसे असे वाटावे असे वातावरण ठेवले होते आम्ही हि तुमच्यातलेच एक आहोत इथे कुणी लहानमोठे नसून आपण आपल्या वसुंधरेला व आपल्या निसर्गाला कसे छोट्या छोट्या साध्या गोष्टीतून संरक्षित करून बहरवु शकतो यासाठी आपण एकत्र जमलो आहोत. हा विश्वास मनामांमध्ये आपल्या साधी राहणी व उच्च विचार सरणीच्या लोकप्रिय अश्या या दोन व्यक्तींनी आपल्या सर्वत्र वावरण्यातून दाखवून दिले.

सर्व जनसमुदायासाठी स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था केली गेली होती. तसेच अनेक स्टॉल लागले होते त्यातून हि बरीचशी झाडपाल्याची माहिती व आपल्याला औषधी उपयुक्त गोष्टींचे प्रदर्शन प्रत्यक्ष अनुभवयास मिळाले. प्रोजेक्टरच्या माध्यमातून अनेक विविध गोष्टींची दुर्मिळ होत जाणारी माहिती या ठिकाणी मिळाली. याच प्रोजेक्टरवर आपल्या देशातील सुप्रसिद्ध फोटोग्राफेर्स लोकांनी आपल्या फोटोंमधून विविध ठिकाणच्या काही अंशी न पाहिलेल्या पशु, पक्षी, झाडे अन निसर्गाची आपल्या सुंदर कलात्मक दृष्ट्या रंगबिरंगी फोटोमधून आपल्या देशातील दुर्मिळ काही फोटोंची बरसात संमेलनाला भेट देणाऱ्या शाळांमधील लहान चिल्लीपिल्लींना आवडून गेली. या सर्व फोटो नियोजनाची जबाबदारी (माझे अहो) निसर्गप्रेमी श्री. विजय शिंदे यांनी अरविंद जी व सयाजी जींच्या संकल्पनेला चालना देत स्वखुशीने स्वीकारली व ती आनंदाने स्वतः खास मुंबईहून संमेलनास उपस्थित राहून पार पाडली. व निखळ आनंद उपभोगला. जिथे खऱ्या अर्थाने निसर्गाच्या बाबतीत सामाजिक बांधिलकी जपली जाते तिथे आपल्या कामांचा आढावा घेत कुठलीही अपेक्षा न करता व स्वतःला होणाऱ्या मेहनतीची तमा न बाळगता विजय व वृषाली शिंदे नावाचे कपल एक मित्र म्हणून सदैव अश्या उपक्रमात चांगल्या कामास उपस्थित राहून मित्र या नात्याने सर्वांना आपल्या परीने होईल तशी मदत करत राहणार.

"झाड" या विषयाला धरून अरविंद जींनी इंडियन भारत या पेजवर एक निबंध स्पर्धा आयोजित केली व त्याच्या पूर्ण संयोजनाची व्यवस्था एक संयोजक म्हणून माझ्यावर विश्वासाने सोपवली होती अन ती मी अमर दीप व श्रीकांत या दोघांच्या साहाय्याने पार पाडली.

अरविंदजींनी किशोर ठाकूर यांच्याशी आम्हां दोघां उभयतांशी खास ओळख करून दिली ती वृक्ष या संमेलनाची अतिशय सुंदर ट्राफी किशोर ठाकूर यांच्या चालनेतून प्रत्यक्षरूपी अवतरली आहे. जी सन्मानित पुरस्कारती सर्वांना खूपच आवडली. ध्यानी मनी नसताना अरविंद जींनी विजय शिंदेंना अचानक स्टेजवर बोलावून सयाजी शिंदेजींच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित केले. असा नकळतपणे होणारा सन्मान अविस्मरणीय असतो.

या संमेलनात सुप्रसिद्ध चित्रकार केशव कासार याची भेट खूप आनंद देऊन गेली. ( विजयचा मित्र व मी त्याला दादा म्हणते. ) सचिन चांदणे आम्हां उभयतांचे चांगले मित्र आहेत त्यांची सोबत कायम आम्हांला सुखावून जाते. अनेक लोकांशी ओळख झाली व अनेक अभ्यासू दिग्गजांची भेट खूप काही शिकवून गेली. अरविंद जींच्या बाबांनी मला लांबूनच ओळखले याचे मला खास अप्रूप वाटले कारण अरविंद जीं च्या "पत्रास कारण कि" या पहिल्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी आमची एकदाच भेट झाली होती. संमेलनास मुंबईही हुन सकाळी ७ च्या आसपास निघून साधारण दुपारी १. ३० ते २ च्या सुमारास आम्ही पालवण येथे पोहचल्याने बाबांनी खूप आस्थेने आमची चौकशी केली व काही वेळ सहजच गप्पा चालू असताना बाबांनी आम्हांला अरविंद जींबद्दल त्यांच्या लहानपणीच्या काही गंमतीशीर गोष्टी खूप कौतुकाने सांगितल्या व नंतर खूप मायेने, आस्थेने आमच्या जेवणाचे बघण्यास तेथील टीमला सांगितले. या सर्व थोरामोठ्यांच्या सानिध्यात वावरण्याचा गोष्टींसाठी माझ्या मते तरी खरोखरच कुठली तरी पुण्याई लागते. सहजच कुणी इतके एकाच भेटीत आपलेसे करत नसते.

सर्वात शेवटी बीड येथील वृक्षसंमेलनाचा समारोप एका दाम्पत्याने असंख्य आजारी पशु, पक्षी, प्राण्यांना जीव लावून त्यांची मनोभावे उपचार करत सेवा केली व त्यांना बरे करून त्यांच्या उचित स्थळी त्यांना पाठविले होते . अश्याच एका ६ महिने आजारी असलेल्या गरुड पक्षावर या दाम्पत्यांनी उपचार करून त्याला तंदुरुस्त केल्यानंतर सयाजींच्या हस्ते निसर्गाच्या सानिध्यात मुक्त संचार करण्यास सोडण्यात आले. असा हा सुंदर सोहळा प्रत्यक्षरूपी अनुभवण्याचे भाग्य आम्हां उभयतांना आमच्या निसर्ग प्रेमातून व सयाजी जीच्या व अरविंद जींच्या या सुंदर उपक्रमात व आधीही सर्व उपक्रमात सतत आपल्या सोबत त्यांनी आम्हां उभयतांना सहभागी करून घेतल्याबद्दल दोघांचे हि मनःपुर्वक आभार... !! __/\__

वृषाली शिंदे...

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू