पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्लास्टिक विरुद्ध प्रदुषण लढा

" प्लास्टिक विरुद्ध प्रदुषण लढा "

     काही ठराविक काळ लोटला कि प्लास्टिक विरोध चा लढा सुरु होत असतो काळी काळ चालला कि पुन्हा जैसे थे . अस किती तरी काळा पासुन चालल आहे जेव्हा केव्हा प्लास्टिक ला विरोध करण्यात येतो तेव्हा प्रत्येकाला

मनापासुन हे सर्व बंद व्हायला पाहिजे अस मनापासुन वाटत नव्याचे नउ  दिवस पुन्हा जैसे थे 

अस का व्हाव किती मोठ संकट आ वासुन उभे आहे आणि आपण किती गाफील आहोत कधी कधी आपलीच आपल्याला मनस्वी चिड आल्याशिवाय राहात नाही हे जे काय काय चाललेल आहे ते बरोबर नाही याचे दुरगामी परिणाम आपल्याला आपल्या पुढील पिढीला निश्चित भोगावेच लागणार आहे एवढ मात्र निश्चित सर्वाना हे सर्व कळते पण वळत नाही अशी अवस्था आहे 

या प्लास्टीकच्या वापरा मुळे खुप नुकसान होत आहे मानवी जीवन याच्या मुळे धोक्यात आलेले आहे 

या प्लास्टिक च्या अति वापरामुळ प्रसंगी जीव सुद्धा जाणार आहे नव्हे जात आहेत

प्लास्टिक हे एक प्रकारचे जहर आहे ज्याला आपण स्लो पॉयझनिग म्हणतो तसे आहे या पॉलीथीन मध्ये गरम खाण्याचे पदार्थ आणल्या जातात काही लोक तर गरमा गरम चहा 

जो नुकताच किटली मध्ये उकळलेला असतो तो गरम - अति उष्ण चहा या पॉलीथीन मध्ये आणतात होते काय पॉलीथीन आणि चहा यांच्यातील घटकांमुळ रासायनिक प्रक्रिया होउन ते तयार झालेल रसायन पोटात जाते ज्याच्या अति वापराने ५६ प्रकारचे कॅन्सर होण्याची दाट शक्यता आहे असे 

शास्त्रज्ञ यांनी वेळो वेळी सांगीतले आहे स्पष्ट केले आहे तरीही आपण लोक तेच करत आहे 

या पॉलीथीन बॅग गाई ढोरांच्या पोटात गेले तर त्यांचा जीव गुदमरून जातो प्राण गमवावा लागतो 

या पॉलीथीनला जमीनीत पुरले तर यांचे डि काम्पोझीशन व्हायला जवळ पास १२०० वर्ष लागतात

संपुर्ण पणे नायनाट होण्यासाठी खुप च मोठा कालावधी लागतो शिवाय ज्या जमिनित पॉलीथीन पुरले आहे त्या जमीनीची 

फर्टिलिटी उपजाउता कमी होते अस जाणकार सांगतात 

एवढ महाभयानक चित्र समोर असताना सुद्धा आपण जर  या

या पॉलीथीनचा वापर केला तर आपल्या सारखे मुर्ख कोणी नाही आपल्या सोबत आपण कित्येक

पिढ्या बरबात करत आहोत याची साधी जाणीवही आपल्याला नाही जेव्हा जाणिव होईल तेव्हा कदाचित वेळ निघुन गेलेली असेल म्हणुन आताच सांभाळवे आताच जागृत होणे गरजेच आहे

" जब जागो वही सबेरा "

मग या परिस्थितीला तोंड देण्यासाठी काहीच उपाय योजना नाही का?

सर्वाना वाटते कि काही तरी उपाय होणे गरजेचे आहे 

प्रत्येक वेळी रस्यावर माल विकणारे किंवा छोटे दुकानदार यांच्यावर छापे टाकुन त्यांना दंड करून होणार नाही

प्रत्येकाच्या मनाने हे सत्कार्य करावे असे मना पासुन वाटायला पाहिजे सुरवात कोणी करायची हा खरा प्रश्न आहे

मी जर नाही वापरले पॉलीथीन तर काय फरक पडणार आहे?

माझ्या एकट्याच्या ने काय होणार आहे ? असा विचार करून चालणार नाही एकट्या ने फरक पडणार नाही जर दहा लोक पॉलीथीन वापरण्यावर बंदी घालत असणार तर मक्कीच फरक पडणार आहे

छोट्या दुकानदारावर कारवाई करून चालणार नाही तर 

ज्या ठिकाणावरून या पॉलीथीन तयार होतात त्या कारखान्याला सिल लावले पाहिजे त्या कारखान्याचे लायसन र दद करायला हवे बाजारात असणारा पोली थीन चा माल जप्त करण्यात यावा 

ज्यांच्या कडे . अशा प्रकारचे प्लॅस्टिक सापडेल त्याना शिक्षा करण्यात यावी तसेच दंडही करण्यात यावा 

सदर प्लॅस्टिक जमा करण्याची योग्य ती मुदत देण्यात यावी मुदती नेतर जर कोणाकडे सापडले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी त्याची अंमल बजावणी करण्यात यावी 

ही कडक कारवाई बघुन इतर लोक चमकले पाहिजे जेणे

करून सदर ललॅस्टिकचा वापर आणि साठा कोणी करण्याचा विचार सुद्धा मनात आणणार नाही अशी कारवाई करण्यात यावी अंमल बजावणी करण्यात यावी 

याचे पालन सर्वानी करायला हवे जेणे करून सर्व जण आपली वसुंधरा हिरवा शालू नेसुन नटुन थटून मिरवली पाहिजे आज आपण सर्वजण असा निर्धार 

करावा कि

आजपासून मी पॉलीथीनचा वापर करणार नाही आणि इतरानाही करू देणार नाही 

या आपण सर्वेजण प्लॅस्टिक मुक्त अभियानात सामिल होऊ या 

आणि आपले संपुर्ण योगदान देणाची शपथ आज आपण सर्वजण घेऊ या..

या अभियानात सामील होऊ या

सर्वाना सामिल करून घे उ या

सुजलाम सुफलाम देशाच्या निर्मिती साठी सहभागी हो उ

या.. घेतलेला वसा जपु या..

 

     श्रीकांत धारकर

      बुलडाणा 

९०११०२३१९८

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू