पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

Chalk and Duster

आज बऱ्याच दिवसांनी निवांतपणे YouTube बघता बघता जुही चावला आणि शबाना आझमी ह्यांची एक movie दिसली...ऑफबीट नाव होते Chalk and Duster....बघू तरी काय प्रकार आहे.ह्या नावाचं कधी सिनेमा आलेला आठवत नव्हता...त्यामूळे बघायचं ठरवलं आणि पूर्ण मूवी दीड तासात बघून झाला, आज लिहायचे ठरवले त्याबद्दल.



कथा सुरू होते कंटाबेन नावाच्या प्रायव्हेट शाळेतून, मुंबैईतली ही शाळा, तशी सर्वसामान्य, इंग्लिश शाळा. इथले शिक्षक ही बऱ्याच वर्षांपासून असलेले. खरा खेळसुरू होतो ते शाळेच्या ट्रस्ट जेव्हा शिक्षणाला एक बिजनेस चे स्वरूप द्यायचे प्रयत्न करतात तेव्हा.. सुरुवात होते  शिक्षकापासून, त्याचे हर प्रकारे मनोबल  खच्ची करणे, बसायच्या खुर्च्या काढून टाकणे, वेगवेगळे विषय देऊन त्यांना नामोहरम करणे आणि मग विद्या(शाबनाआझमी) आणि ज्योती (जुही चावला) चा लढा.


थोडेसे अतार्किक प्रसंग सोडले तर बरेचं से प्रसंग बिचारं करायला नक्कीच भाग पाडतील असे...जसे कितीजणांना आपल्या पहिल्या शिक्षकानी ज्यांनी या आ इ ई शिकवले किंवा पाहिले आकडे शिकवले  ते आठवत असतील ? का शिक्षकीपेक्षा जो देशाला वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मान्यवर देतो आज समाजातील सर्वात दुर्बल घटक मानला जातो? का सरकारी योजना , शिक्षकांना काही सोईसुविधा देत नाही??? ह्यावर मार्मिक भाषण केले आहे. जिथे आज शिक्षण एक वेगळे बाजार झाला आहे तिथे एक वेगळा लढा ..थोडेसे आशादायी चित्र निर्माण करणारा.


एकदा तरी जरूर बघावा असा हा सिनेमा नक्कीच आपल्या सर्व शिक्षकांना एक वेगळ्या चष्म्यातून बघायला लावेल हे नक्की. मागच्या शिक्षकदिन निमित्त फेसबुक वर एक पोस्ट बघितली होती.. आमच्या शिक्षकांनी असे काय केले जे उदो उदो होत आहे आणि खाली टीचर्स (दारूची बॉटल) खाली लिहिले होते ह्या टीचर ने जे शिकवले ते कोणीच शिकवले नाही....

एक विनोदाचा भाग सोडला तर मन  नक्कीच विषणं झाले. ज्या महान आत्म्याने हे लिहिले होते त्याला लिहायला वाचायला...ही शिक्षाकानी शिकवले होते... ह्याचा सरळ सरळ विसर पडला होता ह्या पेक्षा मोठे दुर्दैवी काय असू शकते...




This movie is freely available on Youtube and Amazon Prime. It's a 2016 movie and unheard of as it is having a preachy topic and has no commercial sucess. 


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू