गोड गायिका माणिक वर्मा
माणिकताई वर्माना खरंतर मी खुप ऐकले नव्हते, एक भक्तीगीत "घननीळा लडीवाळा" हे मात्र भक्तीसंगीतात खूपदा ऐकले होते. त्यानंतर रेडिओचा जमाना जाऊन टीव्हीचा जमाना आला. रामनवमीत हमखास ऐकायला येणारे त्याचं अजुन एक गीत "विजय पताका श्रीरामाची झळकली अंगणी" हे गीत माझं त्यांनी गायलेलं आवडीचं गीत.
मला वाटलं होतं की, त्यांचं गाणं हे त्याच्यासारखंच साध, सरळ,सोपं असावं थोडावेळ गुणगुणलं तर,.... पण कधी साधी, सोपी वाटणारी गाणी म्हणायला अवघड असतात हे जाणवलं, बऱ्याच गायिकांची गाणी मी बऱ्यापैकी गायची. कधी अगदी सहज पण सुरात सूर मिळवून जेव्हा पूर्वी रेडिओ होते तेव्हा.
मध्यन्तऱी कराओकेवर गाण्याचा मला थोडा छंद लागला होता. आवड तर होतीच अन संगीताबरोबर गाताना संगीताचा आनंद पण मिळायचा. जवळपास 200/250 गाणी मी गायली असेल.
केवळ आवड आणि छंद आणि गायनाची माझी जी आवड होती ती पण पूर्ण होतं होती. मंगेशकर भगिनी, किशोरदा, रफी ह्याचीही गाणी मी गायली,गाण्यात विविधता होती भक्तीगीत, भावगीत प्रेमगीत, लावणी, मुजरा गीत, भूपाळी सगळी गाणी.
खरच छंदा शिवाय, कलेशिवाय जीवनाला पूर्णत्व नाही ते अधुरं आहे, असं जाणवायचं,कला ज्ञानाच भांडार, विचारासाठी मुक्त दालन.
कधी गाण्याच्या आवडीने, गाण्याच्या प्रेमात त्यातील वादयाच्या, शब्दाच्या प्रेमाने मी ती गाणी गायली, एकंदर भावनांप्रधान, संगीतमय गाणी मला आवडत होती, अगदी विरह गीतातली आर्तता, व्याकुळता मला ते गाण गाण्यासाठी भाग पाडतं होती, वाद्यात विशेष मला सतार,तबला,जलतरंग ही वाद्ये आवडत होती वाद्याचा तो ठेका मला मंत्रमुग्ध करीत असे, याद ना जाये बिते दिनो की "मला आवडलेल गाण, राजेंद्रकुमार ज्या आर्ततेने भावुक संवेदनशील नायक रंगवितो, कमाल! मनाला हृदयाला भिडतं गाण आणि भावनाप्रधान संवेदनशील व्यक्तींना अशी गाणी आवडतात.
मी गायलं ते गाण,आवडलं मला, विशेष म्हणजे स्वरातली आर्तता माझी मला जाणवत होती.दरम्यान मी एका संगीत मंच जॉईन केला. त्यात थिमनुसार गाणी गायली जात होती, त्या आठवड्यात माणिकताईची गाणी गायला सांगितले, अनेक सखी, मैत्रीणी त्यांच्या गोड आवाजात गाणी गात होत्या
"घननिळा लडीवाळा" हे भक्ती गीत माणिकताईंनी अतिशय गोड गायलं आहे.आपणही माणिकताईच गाण गाव असं मला वाटलं, पण पाहिजे तसं जमलं नाही, मलाही आवडलं नाही काही गाण्याना रियाज खुप करावा लागतो, तरीही तितक्या उंचीपर्यत आपण पोहोचू शकत नाही, त्यात आपण गायक नाही, संगीताची आणि आपली ओळख असली तरीही संगीत एक अभ्यास, सराव आहे गाणं परिपूर्ण होण्यासाठी खुप मेहनत अर्थात रियाजाची गरज आहे हे खरं तरीही माझा प्रयत्न चांगला होता, आणि मला ते आवडलं एखादी गोष्ट जमणारच नाही हे गृहीत धरण चुकीचच जितकं गाणं जमलं तितका आनंद मला मिळाला होता, माझ्या शैलीनुसार "छान" असा शेरा मी स्वतः ला दिला, आणि परत माणिकताईच्या गाण्याच्या वाटेला जायचं नाही असं मनाशी ठरवलं.
पण ठरवलेलं प्रत्यक्षात उतरत असं नेहमीच होत नाही,
अनेक सखी मंचावर त्यांच्या गोड आवाजत माणिकताईची गाणी गात होत्या माणिक ताईच्या आवाजाची मोहिनी मनाला मंत्रमुग्ध करीत होती, भान हरपून मी गाणी ऐकत होती, माणिकताईची सर्वच गाणी श्रवणीय,कर्णमधुर, "क्षणभर उघड नयन देवा" भक्ताने भगवंताला घातलेली भावपुर्ण साद,
म्हटलं तर मानसपूजा, प्रार्थना भावपुर्ण गीत,अतिशय आवडलं मला गीत,गाव असं वाटलं त्याप्रमाणे बऱ्याचदा ऐकल्यावर मी गाण्याचा प्रयत्न केला पण म्हणावं तसं जमलं नाही, माणिकताईसारखं गाणं मला जमण शक्य नव्हतं, तरीही मी माझ्या शैलीत प्रयत्न करीत होते गाणं तर गायच, मनाचा निश्चय पक्का होता, गाणं कमी अधिक होईल, पण गाणं गायचा आनंद मिळवायचा,
प्रत्येक गायिकेची एक शैली, ओळख असते, आवाजात वैविध्य असतं तेच मनाला भावत,आवडत,
U ट्यूबवर अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या परीने छानच गायलं होत, मी गायचं ठरवलं, गाण्यातली आर्तता स्वरात उतरली होती, भक्तीभावानं मी ते गाणं
गायलं आर्त स्वर,साद भगवन्तापर्यत खरंच पोहोचली असा विचार मनात सहज आला सहजभाव गाण्यात आला होता मला गायलेलं गाणं खुप आवडलं होत शेवटची लाईन" क्षणभर उघड नयन देवा" फक्त क्षणभर" क्षणभर शब्द खुप आवडला एका क्षणासाठी देवा तू दर्शन दे, असं काहीसं."दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा " एव्हढं अवघड गाणं मी गायलं होत, पण मंचावर काही सख्याना ते थोडं आवडलं नाही, थोडी टीका झाली समीक्षा झाली, प्रतिक्रियेने मनं खुप,खुप नाराज झाले, मी काही गायिका नाहीय, आणि गाणंही शिकलेली नाही फक्त गाण्याची आवड आणि छंद ऐवढंच माझ्यासाठी पुरेसं होत मी साफ दुर्लक्ष केलं प्रतिक्रियेकडे, मनाला मला नाराज करायच नव्हतं कधी आपलं मनं आनंदाच्या झुल्यावर झुलत असतं कुणीतरी येतं, झोका थांबवत मन नाराज होत,झोका म्हटलं की त्यात चढ उतार आलेच, चढ आणि लढ या उक्तीप्रमाणे गाण्याचा आनंद घ्यायचा शेवटी कलाकारांसाठी कला हे आनंदाचं स्रोत असतं, माध्यम असतं,इथे आनंदाचा हिंदोळा झुलवत ठेवायचाय, आनं दाचे डोही आनंद तरंग मनात ठेवायचे, "गाना आये या ना आये गाना चाहिए "
गाणं गाऊन मला जो आनंद मला झाला तो शब्दातीत, एक क्षणभर शब्द ज्याने मला भुरळ घातली.
देवा.... देवा..... देवा.. क्षणभर उघड नयन देवा अतिशय गोड भावपुर्ण गाणं जे माणिकताईनी खुप गोड गायलं आहे.
माणिकताईची गाणी गाताना मला त्यांच्या जवळपासही पोहोचता येईना म्हणून त्यांच्या श्रवणीय व कर्णमधुर आवाजावर दोन शब्द लिहिण्याचा माझा प्रयत्न
धन्यवाद.
