पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

2023...

माझे .... 2023 सालाचे आठवणीचे वर्ष....कसे गेले त्याचा मागोवा...


नवीन वर्ष सुरू होतय...तर या 2023ने काय दिले...हे मागे वळून बघताना बराच आनंद मला बघून हसत असलेला दिसला.

अगदी सुरवातीलाच जानेवारीतच वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्याची तुतारी या 2023 ने मला देऊन माझे मस्त स्वागत केल्याचे स्मरले...मला अलगद मानाच्या सिनियर सिटिझन च्या खुर्चीत बसवले. माझ्या मुलांनी  छान शुभेच्छा देऊन तो दिवस माझा खास बनवला...

या वर्षी मी काही नवीन करायची स्वप्ने बघितली होती ती सत्यात उतरताना प्रत्यक्षात बघितली....ते म्हणजे माझे अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक वर्षात असलेली आस्था ..त्याला मूर्त रूप म्हणजे माझी दोन युट्यूब चॅनलची सुरुवात. गेली अनेक वर्षे मी स्तोत्र पठण वर्ग घेत होते...पण करोना नंतर ते बंद पडले. परंतु युट्यूब मार्फत मी माझे गीतेश्वरी आणि स्तोत्र पठण ही दोन्ही चॅनल सुरू केली. अत्यंत आनंद मला या मुळे मिळत आहे. भगवान श्री कृष्ण यांचे रोज नव्याने दर्शन होत आहे...नव्याने ओळख घडत आहे...प्रत्येक श्लोकावर स्वतः विवेचन करत असल्याने विचार ही होत आहे....त्यामुळे ब्रेन ला गती देणे चालू आहे.????

या 2023 मध्ये माझी अजून एक बकेट लिस्ट मधील एका गोष्टीला टिक मार्क झाले आहे...ते म्हणजे गंगा मैया चे दर्शन ,व गंगेत येथेच्छ स्नान, आणि सूर्याला अर्ध्य देणे. ही खूप वर्षा पासुन ची ईच्छा पूर्ण झाली, ते ही जोडीने आमच्या लग्नाच्या वाढदिवस दिनी.....उत्तराखंड ट्रीप ही अविस्मरणीय अशी झाली.....निसर्ग वेडी मी नैनितालच्या प्रेमातच पडले...ऋषिकेश आणि हरिद्वार येथील गंगाजीची आरती आणि गंगास्नान म्हणजे वर्णनातीत आनंद... 

ऋषिकेश येथील रिव्हर राफ्टिंग , नैनीताल येथील पॅराग्लायडिंग आणि झिप लाईन , रोप वे अशी अनेक थरारक गोष्टींचा अनुभव मी या 2023 मध्ये घेतला. 

तसेच एक छोटी ट्रीप महाबळेश्वर आणि पाचगणी इथे केली...पाचगणी इथे मुक्काम करायची इच्छा ही या वर्षीच पूर्ण झाली. 

निसर्ग खूप बघितला, खूप आनंद घेतला या वर्षात....

भरभरून जगले मी निसर्ग...

डोळ्यात भरून घेतला निसर्ग...

पिऊन घेतला निसर्ग.....

 

दोन लग्ने आणि मुंज निमित्ताने सर्व नातेवाईक ही या वर्षी भेटली...मन आनंदले.

हातून अनेक लिखाण घडले...ब्लॉग वर अनेकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या....

दोन दिवाळी अंकातून कथा प्रसिद्ध झाल्या...

गत वर्षी प्रमाणे 2023 मध्ये देखील नवरात्रीत नऊ दिवस सलग सोशल मीडियावर लेखन झाले....वेगवेगळे विषय त्यामुळे हाता खालून लिहिले गेले....

आनंद मिळत गेला......

 माझा गोड नातू.....या वर्षी त्याने आपले स्कूल गाजवले...एका वर्षात सलग तीन बक्षीस कप , मिडेल घेऊन आला....त्याच्या गीता पठण स्पर्धेतील यश मनाला खूप खूप आनंद देऊन जातोय.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या डिसेंबर मध्ये संपूर्ण देशभरात राम भक्तीचे वाहणारे वारे बघून मन भरून येत आहे...अखेर रमलल्लाला सुध्दा न्याय मिळाला, तो ही मोदींच्या राज्यात....आता रामराज्य यायला वेळ लागणार नाही....

आता माझ्याच वाढदिवसा दिवशी म्हणजे 22 जानेवारी रोजी रामलल्ला आपल्या आयोध्या निवासी विराजमान होतील....

माझा हा स्पेशल दिवस ....माझी एकसष्ठी.....हा दिवस रामराया मुळे सारा देश दिवाळी सारखा साजरा करेल....

वेगळे सेलिब्रेशन ते अजून काय असण्याची गरज आहे.

त्यामळे ही मी खूप आनंदी आहे....

या पवित्र दिवशी तुमच्या शुभेच्छा या मला मिळतच आहेत असे मी म्हणेन ...हो न...!

2023ला बाय बाय म्हणताना जड जातंय....पण नवीन वर्ष तर यायलाच हवे... नाविन्यांचे स्वागत तर केलेच पाहिजे....

सो....Happy Happy New Year 2024...


पल्लवी उमेश

31/12/23.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू