पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बेपरवाह मुस्कुराने की वजह ढूंढते हैं

बेपरवाह मुस्कुराने की
वजह ढूंढते हैं


प्रत्येक चेहर्‍याच्या मागे वर्षानुवर्षाचा इतिहास असतो… कधी कधी कोणी इतक्या जोरात हसायचा प्रयत्न करतात की मनातले सल उघडे पडते… मनमोकळे हसणे हा दैवी आशीर्वाद आहे, एखाद्या न संपणार्‍या उदबत्तीचा अहोरात्र दरवळणारा सुगंध आहे… कुणाचे लाघवी हसणे आपल्याला क्षणात त्या व्यक्तीच्या मोहात पाडून जाते तर कधी कुणाचे बिनधास्तपणाचे खदखदून हासणे आपल्याला विचार करायला भाग पाडते…  कुणाची गालावरील खळी त्या भोवर्‍यामध्ये आपल्याला खेचुन घेते तर कधी एखाद्या लहान मुलाच्या हसण्याचा आवाजही वेड लावून जातो…. पण कधी कधी न रहावुन या माणसांच्या हासण्याचा शोध सुरु होतो.. आपण या हसण्यापलिकडे जाऊन या माणसांचे अस्तित्व शोधू लागतो… कोणी विदुषकाचे आयुष्य जगत असतो तर कोणी पिंजर्‍यातील खेळ करणार्‍या माकडाचे तर कोणी गुमान पिंजर्‍यातुन बाहेर येऊन चिठ्ठी उचलुन देणार्‍या पोपटाचे तर कोणी ओझे वाहणार्‍या गाढवाचे तर कोणी माणुसकी जपणार्‍या माणसाचे! आपणही यातील कोणत्या ना कोणत्या भुमिकेत असतो जरूर.. विचार केल्यास आपलाही थांगपत्ता लागेल हे नक्कीच! कृत्रिम हासणे अवघड नाही… पण त्या कृत्रिमतेच्या पलिकडील आयुष्य जगणे अवघड आहे…. ते सगळ्यांनाच जमेल असे नाही! जखम लपविण्यासाठी आधी जखम स्वीकारावी लागते व त्यानंतर ती लपविण्यासाठी त्यावर ठेवणार्‍या आवरणालाही झेलावे लागते हे नक्कीच! हासणे शृंगारीकही असते अन अक्राळविक्राळ आसुरी असते… हसण्यासाठी जीवनाचा अर्क गळ्यातून उतरावा लागतो… जसे ढोलकी वाजवण्यासाठी तिचे कातडे आधी बडवावेच लागते, तेव्हाच ती कुठे खणखणीत वाजते… आपलेही तसेच, ते जीवनहास्य ओठांवर उमटण्यासाठी आधी आपल्याला जीवनाला स्वीकारावे लागतेच! … ती निरागसता जन्मतः असणे वेगळे अन तीच निरागसता मरताना असणे वेगळे!

आज देखा है खुद को
कुछ पुरानी तस्वीरों मैं ….
हम भी मुस्कुराते थे कभी
बेपरवाह अन्दाज़ से

बचपन में जहाँ चाहा
हंस लेते थे,
बेपरवाह अन्दाज़ से
जिया करते थे

पर अब मुस्कुराने
को तमीज़ चाहिए
और आँसुओं को तनहाई

माना इक कमी सी है,
ज़िन्दगी थमी सी है
दिल की धड़कनों को
क्यों दरकिनार करें

चलो  बेपरवाह अन्दाज़ से
मुस्कुराने की वजह ढूंढते हैं
जिंदादिली से जीने का 
बहाना धुंडते है
बेपरवाह मुस्कुराने की
वजह ढूंढते हैं

अनुपमा

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू