पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

चिमणी

*चिमणी दिवस*  

आज २० मार्च, चिमणी दिवस. योगा प्राणायाम करताना चीव चीव असा नेमका आवाज योग निद्रेच्या बाहुपाशात विशेष लक्ष केंद्रित करून गेला. 

बाळपणीच्या अनेक कविता ह्या छोट्याश्या इवल्या इवल्या चिऊताई वर रचल्या गेल्या आहेत. चिऊताई आज आपल्याला फक्त कवितेत बघायला मिळते. जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली ही चिऊताई. 

१९५० मध्ये चीनी लोकांनी चिमण्या मारल्या कारण चिमण्या पिकांचं नुकसान करतात. असले नुकसान पाहून चिनी शासनाने चिमण्यांना मारण्याचे आदेश दिले. या मुळे मोठ्या प्रमाणात चिमण्या मारण्यात आल्या. परंतु याचे परिणाम उलट झाले. चीनमध्ये इतर किडे, जीवजंतू आणि मुंग्या ची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. हे किडे पिकांचे चिमण्या पेक्षा अधिक नुकसान करू लागले. आणि चीन मध्ये लोकांना अन्नाची उणिव भासू लागली.

चिमणीला गुजराती भाषेत चकली म्हणतात. गुजरातचे मोठे कवी रमेश पारेख यांच्या कवितेतील एक ओळ *मारे फळीए चकली बेसे ये मारु रजवाडू* आहे. अर्थात माझ्या व्हरांड्यात वळचणीला चिमणी येऊन बसते तोच माझ्या करीता राजवाडा आहे. ह्या ओळी कृत्रिम धनाढ्य जीवन जगणाऱ्यानां बरेच काही सांगून जाते.

एकेकाळी भारताला *सोनेरी चिडिया* म्हणजे सोन्याची चिमणी म्हटलं जातं असे. विदेशी आक्रमणकाऱ्यांनी यथेच्छ लुटुन तीला बिचारी करून टाकले होते. हिंदी चित्रपटात असलेले प्रसिद्ध गाणें "जहाँ डाल डायल पर सोने की चिडिया करती है बसेरा" ऐकू येऊ लागले व पुन्हा एकदा भारत सोन्याची चिमणी होवो पण मजबुत की कोणी तिच्या कडे वाईट नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाही अशी. 

आजकाल शहरांतून चिमणी दिसणं मुश्किल झाले आहे. प्रदुषण व विविध प्रकारचे तरंग आणि कमी होत जाणारी वृक्षवल्ली ह्या छोट्याश्या जीवाला नामशेष करु लागली आहे. 

तसेच घराघरातील चिमण्या आपल्या शिक्षणाचे पंख लावून परदेशी वा दूर मोठ्या शहरात उडून गेलेल्या बघायला मिळतात. त्यांनी आपली घरटं तेथे बांधून प्रपंच सुरू केला आहे. 


कुणी ही यावं टपली मारुन जावं अशी निरपराध लोकांची व्यथा चिऊ मार्फत व्यक्त केली जाते. सकाळी सकाळी चिमण्यांची चिव चिवने भास्कराचे आगमन होत असे व तीची किलबिल खुप मधूर वाटत असे. 

चारा खा पाणी पी अन् भुर्रकन उडून जा म्हणत बाळाला घास भरवला जातो. साधारण २५, ३० वजन ग्रॅम वजन असलेली ही चिऊताई ३५ किमी वेगाने उडू शकते. चिऊताई चे घरटं शुभ मानलं जातं. चिवचिवाट करत एक एक काडी आणून वळचणीला घरटं बांधणारी चिमणी जीवनात एक संदेश देत असते. कितीही कमकुवत असाल तरी श्रम करून जीवन जगता येते. 

आता उन्हाळ्यात वाटी भर पाणी आणि चार दाणे बाजरीचे ह्या छोट्याश्या इवल्या इवल्याशा जीवा साठी चिऊताई साठी ठेवून निसर्गाचा समतोलपणा साधूया. एवढीच ह्या चिमणी दिवस शुभेच्छा.

*चिमुकली ती चिमणी*

चिव चिव करते ती
काडी काडी जोडूनी ती
पिलांसाठी सजवत
घरटं उभे करे ती

इवलाशा जीव तीचा
श्रम मात्र फार फार
कीटक अळी खाऊनी
पर्यावरणास आधार

चिमणी दिवशी घेऊ
प्रण एक इवलाशा
ठेवूया वळचणीला
थोडं पाणी दाणे एक पशा

*ॐप्रकाश शर्मा*

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू