रंगात रंगून साऱ्या
रंगात रंगून साऱ्या रंग माझा वेगळा.........
आज रंगपंचमी धुळवड . वेगवेगळया रंगांनी न्हाऊन निघणारी सगळी जण प्रत्येक रंगाचे एक ना खास वैशिष्ट्य असते त्या वरुन दुखः एनर्जी अशा सगळया भावना व्यक्त होतात हिरवा रंग हा एनर्जी च रंग जीवन समरसून जगणारा, प्रत्येक गोष्ट आवडीने करूनपाहण्याची ईच्छा बाळगणारा.तजेला देणारा . जीवनसत्व भरपूर असलेला .पांढरा रंग हा सात्विक जीवन सगळया वृत्ती कंट्रोल मधे ठेवणारा. तर लाल रंग हा सांभाळा स्वतःला सांगणारा डेंजर झोन दाखवणारा आपण ही सिग्नल लाल झाला की थांबतोच. ट्रॅफिक चे rule पाळत असताना हिरवा पिवळा व लाल रंग च तर वापरतात. हिरवा रंग पुढे चला सांगतो तर पिवळा रंग प्रोसेस मधे आहे सांगतो आणि लाल रंग थांबा पुढे धोका आहे अस सांगत असतो.
रंगांची सरमिसळ सगळे रंग एक केले की काळा रंग च तयार होतो. म्हणून आयुष्यात आपल्या चांगल्या रंगाचे महत्त्व जास्त असते तुमच्यावर कोणत्या रंगाचा प्र भाव आहे त्या प्रमाणे माणसाची वृत्ती बनते खरी.
अगदी लहानपणीपाच सहा वर्षाचे वय असेल वडील पिचकारी आणून द्यायचे .बादलीत रंग तयार केल्यावर रस्त्यावरच घर होते त्या मुळे दोन दिवस आधीपासूनच पाणी उडवायची मजा असायची.तो निखळ आनंद असायचा भिजवायचे एखाद्याला ते. जाणाऱ्या येण्याच्या अंगावर पीचकारी ने पाणी उडवणे आणि पटकन लपून बसणे. आणि आनंदाने टाळ्या वाजवण्याची पण एक मजा होती. तेंव्हा आठवत आहे दुपारी बारा नंतर नगरपालिकेची गाडी यायची आणि सगळी कडे घरावर गल्ली मधे पाणी उडवत जायची.पण जसं जसं वय वाढत गेल तस रंग खेळणे बंदच झाले . कारण फक्त गुलाल किंवा कोरडे रंग लावून खेळत नसत. तर ऑईल पेंट चे कलर वापरायला सुरुवात झाल्यावर ती रंग खेळण्याची मजाच संपुन गेली खरी.
आता मात्र लिखाणातून वेगवेगळया रंगाची व्यक्तिचित्र रंगवत वेगवेगळया माणसांच्या स्वभावाच्या रंगाच्या शेड अनुभवलेल्या शेअर करण्यातच आनंद मिळायला लागला.त्या वरून लक्षात आले आरे सगळे रंग तर आयुष्यात हवेच असतात पण सगळया रंगाचा मिळून एकत्र केला तर ब्लॅक कलर तयार होतो.त्या मुळे आपल्या हातात आहे आपल्या आयुष्यात कोणत्या रंगांचे प्रभुत्व असायला पाहिजे.चला तर आपल्या मधे कोणता रंग भरला आहे व कोणता रंग आपल्या आयुष्यात रंगाचा बेरंग करणारं नाही हेरंगाचे वैशिष्ठ्य ओळखत आपल्यात जीवन समरसून जगणारा उत्साही रंग थोडासा प्रेमाचे प्रतिक असलेला रंग त्यात मिसळत रंगपंचमी साजरी करू या की.जीवन समरसून जगणे हीच तर रंगपंचमी.
सौ माधुरी बर्वे (तारापूर).
