पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सफर बैलगाडी ची

'सफर बैलगाडी ची' 

सध्या परीक्षेचा मोसम संपला की सुट्ट्यांचा मोसम चालु होतो. लगेचच लोकांचा ट्रेकिंगला जाण्याक्या उत्साहाला उधाण येते. औरंगाबाद येथे तर खूप सारे ट्रेकर,ट्रेकिंग चे ग्रुप च आहेत. हिमालयाच्या ट्रेकिंग चालु च होतात. अशीच आठवण माझे वडील आम्ही त्यांना आप्पा म्हणत असू ते. व माझे सगळयात धाकटे वसंत काका असेच ट्रेकिंग साठी कायम उत्साही. कधीही ,कुठेही जायला अगदी उन्हाळा असो की पावसाळा सतत एका पायावर तयार असणारे .सगळ्यांनाच गुहा, दऱ्या, डोंगर पालथी घालायची आवड. एकदा असेच काका तेव्हा 65  व आप्पा 75 वर्ष. त्यांचे दोघांचे कधी ठरले माहीत नाही. पण सकाळी चहा पिऊन झाला आणि दोघेही कपडे घालून निघाले!!! येतो जरा जाऊन ,असं म्हणाले की काकूच्या व आईच्या पोटात गोळाच यायचा. आता कुठे जाणार? कोणता किल्ला?? किती वाजता परत येणार?? असा चेहरा प्रश्नार्थक असायचा. बरं निघताना हटकायचे नाही हे तर ठरलेलेच होते. त्या दिवशी म्हणाले म्हैसमाळला जाऊन येतो ,व येताना निपट निरंजन सुद्धा करून येऊ. तिकडे पोहोचले खरे. बस वगैरे व्यवस्थित मिळाली. आज आप्पांना जरा थोडे थकल्यासारखे वाटत होते. निपट निरंजन येथे गुहा होती व उंच डोंगरावर देवीचे देऊळ होते .काका म्हणाले आप्पा तू थोडा थकलेला दिसतोस. इथेच आराम कर मी वर जाऊन देवीचे दर्शन घेऊन येतो. आप्पा खरेच थकले होते त्यामुळे ठीक आहे!! बसतो मी इथे, असं म्हणाले. तू जाऊन ये असं म्हटल्यावर काका डोंगर चढून देवीचे दर्शन घेऊन खाली आले. बघतात तर काय ?त्यांना आप्पा कुठेच दिसेना. त्यांना वाटल हा गुहेत गेला की काय ?म्हणून तिकडे निघाले गुहा खूपच खोल होती. तिकडून तीन-चार कॉले ज ची मुले येताना दिसली, म्हणून त्यांना विचारले की  आजोबा दिसले का रे तिकडे जाताना किंवा येताना ??तर मुल म्हणाली,नाही .मग यांना वाटले माझी वाट पाहून हा वरती डोंगरावर तर गेला नाही? म्हणून पुन्हा ते डोंगर चढून वर गेले. पण तिथे काही अप्पा दिसले नाही. मग मात्र त्यांचे धाबे दणाणले. त्यांनी जोरजोरात आप्पांच्या नावाने हाका मारायला सुरुवात केली. पण कुठूनही आवाज येईना. आता त्याने डोंगर उतरायला व आप्पांच्या नावाने हाका मारायच सपाटाच लावला. शेवटी आता ही शेवटची हाक असं मनाशी म्हणत  जेवढ्या जोरात आवाज काढता येईल तेवढ्या जोरात काढत 'आप्पा 'अशी हाक मारल्यावर, त्यांना शेजारच्या करवंदाच्या  जाळीमधून अगदी बारीक आवाज आला. वसंता, मी इथे आहे. आता कूठे काकांच्या जीवात जीव आला. पण त्यांना आप्पा कुठे दिसेना. म ग त्यांनी पुन्हा विचारले तू कुठे आहेस ??बाहेर ये. तर पुन्हा बारीक आवाजात आप्पा म्हणाला ,हा मी येथे फांदीला पकडून आहे .मग नीट पाहिल्यावर कुठे काकांना आप्पा करवंदाच्या जाळीत अडकलेले दिसले. त्यांनी दोन्ही हातांनी फांदी घट्ट धरली होती. त्यांना बाहेर येता येत नव्हते. ते वसंत काकाला म्हणायला लागले, तू औरंगाबादला जा, आणि समीरला घेऊन ये. तोवर मी फांदी पकडून बसतो. काका त्यांना सांगत होते अरे हळूहळू प्रयत्न तर कर! पण ती करवंदाची जाळी असल्यामुळे तिथे काटे भरपूर होते त्यांना तिथून बाहेर निघताच येई  ना. तेवढ्यात दोन-तीन मुले त्या  बाजूला येताना दिसली. त्यांच्या मदतीने आप्पांना बाहेर काढले खरे. पण भीती मुळे  त्यांना पुढे पाऊलच टाकवे ना .मग जवळच हॉटेल होते तिथे हळूहळू त्यांना घेऊन गेले. व चहा बिस्कीट खायला दिली .थोडीशी हुशारी आल्यावर हळूहळू चालायला सुरुवात केली .तेवढ्यात एकच बैलगाडी रिकामी दौलताबादला जात होती. मग हे दोघे म्हणाले तिथपर्यंत तर  जाऊ. असं म्हणत बैलगाडी मध्ये जाऊन बसले . गाडी वाला म्हणाला ,आजोबा घट्ट पकडून बसा. रस्ता अगदी खराब आहे. बैलगाडी एवढ्या जोरात उडत होती. दोघे एका जागीच घट्ट पकडून बसू शकत नव्हते. आधीच दोघेही बारीक त्यात वय वर्ष 75 आणि 65 त्यांना वाटायला लागलं दौलताबाद येईपर्यंत एक तरी हाड  तरी शिल्लक राहते की नाही.???  सारखी बैलगाडी उडत होती व ही दोघं वर खाली बसली जात होती.त्यांना वाटायला लागले चालत गेल तर बर.पण कसेबसे बसुन दौलताबाद आले.तिथे उतरल्यावर त्यांना   औरंगाबादची एसटी ऊभी असलेली दिसली. पण ती  बस  हीss खचून भरलेली होती. आत पाऊल टाकायला सुद्धा जागा  नव्हती. बरं ही एसटी गेल्यावर अजून दोन तास तरी एसटी नव्हती. शेवटी कसेबसे एकदाचे त्या एस टी मधे घुसले खरे!!! आप्पांच्या कडे बघून एकाने त्यांना बसायला जागा दिली .पण "बिचारे", काका पिशव्या हातात धरून कसे बसे त्यांच्याजवळ उभे राहिले. एकदाचे औरंगाबाद आल्यावर रिक्षा पकडून घरी आले. अरे!!! आज लवकर घरी आले?? असं सगळ्यांनी विचारायला सुरुवात केली. तरी दोघे एकss नाही की दोन नाहीss. मग आप्पा आडवेच झाले. काका म्हणायला लागले "आप्पाला मीठ टाकून गरम पाणी करून शेकायला पिशवी द्या" वहिनी. आम्ही सगळे विचारायला लागलो काय झालं एकदम. विचारतोय तर कोणी काही बोलायलाच तयार नाही. आईने लगेच शेकायला पिशवी दिली. थोड्यावेळाने त्यांना थोडी हुशारी आली.  .मग जेवायच्या वेळेस थोडा आराम झाल्यामुळे बरे वाटत होते. मग काकांनी एक एक प्रसंग रंगवून सांगायला सुरुवात केली. आज आप्पा जाळीत कसा अडकला?? मला कसा औरंगाबादला  पिटाळत होता, समीरला घेऊन येण्यासाठी. आणि बैलगाडीची सफर कशी झाली. सगळ्यांची हे ऐकून हसता हसता पुरे वाट झाली खरी.

पण म्हणतात ना जीत्याची खोड.......

तीन दिवस नाही झाले तोवर पुन्हा आपली जोडी तssय्या s र. आता कुठे निघालात तर म्हणतात पैठण......

सौ माधुरी बर्वे (तारापूर).

7499654342

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू