पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

लेखमाला-मागे वळून पहातांना-लेख- ९ वा

ई-दैनिक साहित्यसेवा- २७ एप्रिल-२०२४ अंकात-

लेखमाला- मागे वळून पहातांना -(लेख- ९ वा )

लेखन सक्रियता महत्वाची

--------------------------

मित्र हो- चाळीस वर्षांच्या माझ्या सक्रिय लेखन प्रवासाने मला लिहिते ठेवले आहे.  "माझ्या हातून वेळोवेळी सिद्ध झालेल्या लेखमाला-उपक्रमांमुळे हे शक्य होऊ शकले.


आज मागे वळून पहातांना जाणवते "विविध साप्ताहिके,

रविवार साहित्य-पुरवण्या, मासिके "यांच्या संपादकांनी लेखन संधी दिली " ही एका अर्थांने "लेखन परीक्षा "होती.

कारण विषयानुरूप लेखन, शब्द मर्यादेत लेखन, आणि रोचक, मुद्देसूद, शैलीदार लेखन ", हे अत्यंत महत्वाचे धडे या सर्व संपादक - स्नेह्यांनी माझ्याकडून गिरवून घेतले.


लेखक -कवींना मिळणारी वाचकांची पसंत पावती " याकडे संपादकांचे लक्ष असते.यातूनच "संपादकांनी घडवलेला असा मी एक "लेखक-कवी" झालो.

या "लेखन -परीक्षा " अनेकवेळा मी दिल्यात, अजून ही देतो आहे. या सर्व संपादकांचे कृतज्ञतापूर्वक ऋण व्यक्त करणे, हे माझे कर्तव्यच समजतो.


मराठवाड्यातल्या बहुतेक सर्वच पेपरमध्ये मी 1986 ते 2006 अशी 20 वर्ष प्रचंड लेखन केले,

मराठवाडा, अजिंठा, देवगिरी तरुण भारत, लोकमत,

एकमत, लोकपत्र, गोदातीर समाचार, मराठवाडा साथी,

दिलासा, वगैरे ..

हे झालं सुरुवातीच्या काळात ते स्थिरतेच्या काळात.


1988-2000  या दरम्यान मी अनेक लेखन उपक्रम

केले यातील काही उल्लेखनीय उपक्रम -

१.

दै.मराठवाडा रविवार पुरवणीत मी  ८९-९०  या अवधीत

मी " व्यक्ती-चित्रणाची " लेखमाला प्रकाशित.(२२ लेख)


२.दै.अजिंठा रविवार पुरवणीत - "वाटेवरचे सोबती "

ही व्यक्ती-चित्रण "लेखमाला प्रकाशित.(१५ लेख ) ,


३. दै.सकाळ -रविवार पुरवणी- बालमित्रांसाठी

सुट्टीचे दिवस " यात लेखक -तुमच्या भेटीला "

ही परिचय मालिका (३० भाग ) प्रकाशित.


४.मासिक कुसुमाकर- मुंबई

महाराष्ट्रातील बालसाहित्य लेखकांची परिचय लेखमाला प्रसिद्ध झाली


पुढे - २००६ मध्ये परभणीहून पुण्यात वास्तव्यास आल्यावर अनेक नियतकालिकांतून मी लेखन सुरू केले-


सकाळ -पुणे, म.टा. पुणे,  मासिक-सत्याग्रही विचारधारा-पुणे, मासिक -संतकृपा- पुणे ,मासिक - एकता, मासिक - उत्तम कथा ,  मासिक निर्मळ रानवारा, किशोर मासिक, या प्रसिद्ध नियतकालिकातून माझे साहित्य प्रकाशित होत गेले.


संपादक - घनश्याम पाटील यांनी त्यांच्या साप्ताहिक-साहित्य चपराक, मासिक चपराक, चपराक दिवाळी अंक "या तिन्हीतून "लेखमाला, बालसाहित्य, कथा आणि कविता असे विपुल आणि विविध लेखन संधी दिली व पुण्यात ओळख मिळवून दिली.


किस्त्रीमचे विजय लेले, यांच्या प्रोत्साहनामुळे  किर्लोस्कर, स्त्री मासिकातून मी लेखमाला, कथा, कविता, पुस्तक परिचय लेखन केले. "किस्त्रीम " या प्रसिद्ध दिवाळी अंकात माझ्या कथा प्रसिद्ध झाल्या.


लोकमत पुणे- मध्ये गझलकार प्रदीप निफाडकर रविवार पुरावणीचे काम बघत, त्यांनी "पुस्तक परिचय " लेख लिहवून घेतले.


एक खरे सांगू का मित्रांनो-

प्रिंट मीडियात लेखन उपक्रम करतांना लेखक म्हणून आपला "कस" लागत असतो, कारण इथे आपले लेखन " संपादकांच्या नजरेखालून जात असते, यावर संपादकीय संस्कार होतात, ", लेखन साभार परत " होत असते,

ही शिकवण मिळते , आणि यातूनच पुढे आपल्या हातून

"सकस लेखन " होत जाते . 

हा माझा लेखन अनुभव आहे. लेखन-संस्कार करणारे

संपादक मित्र मला दर वळणावर भेटतात " हे माझे

लेखन भाग्यच आहे.

२००६ ते २०११ या पाच वर्षात सगळे लेखन "हाताने लिहिलेले असे, त्यामुळे "भक्कम लेखन बैठक "ही जमेची बाजू असल्याने हे सगळे शक्य होत असे, आता मी सेवानिवृत्त झालेलो होतो, लेखन आवेग - लेखन - वेग, आणि लेखन वेळ-," या सूत्रावर आधारित माझा लेखन-दिनक्रम " छान सुरू होता.

***

बाकी पुढे नव्या लेखात..

-----------------------------------------

-अरुण वि.देशपांडे-पुणे

9850177342


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू