पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रश्नाला बगल

*" प्रश्नाला बगल"*



*ती* - (हसत हसत आणि प्रश्नार्थक नजरेसह) कविता करताना तुझ्यासमोर कोण असतं रे?
*तो* - (मोठेपणाचा आव आणत) अगं कविता करता येत नाही. ती होते. It's spontaneous!
*ती* - प्रश्नाला बगल देऊ नकोस. कोण समोर असतं, ते सांग. (थोडसं रागात)
*तो* - हे बघ, तुला माहितीये, मी खोटं कधी बोलत नाही. तुझ्याशी तर नाहीच नाही.
*ती* - (एकदम पुणेरी Tone मध्ये) हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही.
*तो* - कविता होताना व्यक्ती नाही, *स्थिती* म्हणजे *परिस्थिती* समोर असते.
*ती* - पण तुला स्थिती किंवा परिस्थिती या शब्दांवर जोर देण्यापेक्षा अवस्था असंही म्हणता आलं असतं.
*तो* - हो ना! पण अवस्था या शब्दात *ती* नाहीये ना. ती स्थिती आणि परिस्थिती या शब्दांतच आहे. अगदी इति सारखी शेवटी......
*ती* - (साभिमान) ते मला लक्षात आलंच होतं. म्हणून तर मी मुद्दाम तसं विचारलं.
*तो* - गॅसवर काही ठेवलंयस का तापायला?
*ती* - अरे हो! दूध ठेवलंय मंद आचेवर.
*तो* - ओके ओके......



आवडला का संवाद? गालातल्या गालात हसलात का? रसिक आहात म्हणजे! 
*॥ जय श्रीकृष्ण ॥*


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू