पर्यावरण दिन
*प्र - बोध ( प्रसंगातून बोध) २३९*
*५जून २०२४*
*पर्यावरण दिन*
"आज पर्यावरण दिन तरी केवढ्या मोठ्या प्रमाणात फटाकडे वाजवणं आणि डीजे लावणं चालू आहे.. जेवढं प्रदूषण करतात तेवढ्या प्रमाणात झाडे लावण्याचे काही यांना सुचत नाही", पर्यावरण प्रेमी काकांच्या मुखातले हे उद्विग्न उद्गार.
"जाऊ द्या हो! हल्लीच्या लोकांना सल्ले दिलेले आवडतात का? आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण करूया.. बरं कुठल्या कुठल्या प्रकारची रोपे आणली आहेत तुम्ही? चला 'शुभस्य शीघ्रम' दरवर्षीप्रमाणे आपण आपला झाडे लावण्याचा संकल्प पूर्ण करूया. गेल्यावर्षीचं हे बाळ केवढं मोठं झालं आहे पहा!वेळच्यावेळी त्याची निगा राखण्याचं फळ", काकींनी सकारात्मक बोलण्याने काकांच्या मनावरचा ताण दूर केला.
बोध - आनंद व्यक्त करताना तो झाडे लावूनच केला तर तो आनंद चिरकाल टिकेल.
२) पर्यावरण दिनी फक्त संकल्पपूर्ती म्हणून झाडे लावण्यापेक्षा त्याचे जतन करण्याची सुद्धा जबाबदारी घ्यायला हवी.
सौ. विद्या मलवडकर *(विद्याराणी)* तारगाव सातारा.
