पर्यावरण
पर्यावरणीय शिक्षणाचे महत्त्व: शुभांगी पासेबंद
पर्यावरण ऱ्हास थांबवणे ,थोपवणे,ही अन्य कुणाची तरी जबाबदारी आहे असं प्रत्येकच व्यक्ती समजत असते .खरंतर पर्यावरणाच्या रक्षणाची निसर्गाच्या ऱ्हासाची वाढ थांबवण्याचे सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करायला हवी. ते शिक्षण सर्वांना द्यायला हवं .
गेले काही वर्षापासून आपल्या पृथ्वीवर पर्यावरणाचा ऱ्हास झपाट्याने होत आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि ओझोन लेअरला भोक पडणं हे अतिशय धोकादायक संकेत आहेत .
जोशी मठच्या घरांना जाणारे तडे, केदारनाथ ला झालेली दुर्घटना, अनेक दर्डी कोसळणं माळीनिंग सारखं एखादे पूर्ण गाव वाहून जाणं भयानक आहे. निसर्ग जणू काय, आपल्याला ,'मला वाचवा' अशी हाक देतो आहे. त्या पृथ्वीचं त्या र्हासापासून आपल्याला रक्षण करायचं आहे .मुंबई शहरातील,या बेटावर ,समुद्र हटवून अनेक इमारती बांधल्यामुळे, समुद्राचे पाणी बेफाम होऊन अन्यत्र पसरणे धोक्याची घंटा आहे.सुनामी येण भूकंप होण या गोष्टी पर्यावरणाची चिंताजनक स्थिती दर्शवतात.
खरं सांगायचं तर जंगल हे पर्यावरण रक्षणाचे मोठे साधन असते .पण त्याऐवजी मानवाने सिमेंट जंगल वाढवली आहे .आजच्या या सिमेंटच्या जंगलामुळे ते पाणी जमिनीत मुरायच्या ऐवजी वाहून जात आणि त्यामुळे पर्यावरणाचे असंतुलन वाढु शकतं .
पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी माझ्यासारखी सामान्य व्यक्ती काय करू शकते ?
प्रत्येक व्यक्ती पर्यावरणाचा र्हास थांबवण्यासाठी आपापला खारीचा वाटा नक्कीच उचलू शकते.
याचे शिक्षण बालवयापासून मृत्यूपर्यंत द्यावे
1 )झाडे लावून पक्षी वाचवु या: माणसाचा, पक्षी जगताशी संबंध तर बालपणापासूनच असतो. लोकमान्य टिळकांना जेलमध्ये चिमण्या चिवचिवाट करून सोबत करत असत असा देखील उल्लेख आहे . पंचतंत्रानुसार पक्ष्यांना पारंपरिक ज्ञानाचा खजिना मानलं जातं . पक्षी घरटे सुद्धा आजूबाजूचा परिसर आणि माणसं आपल्याला त्रास देणार नाहीत नाही बघूनच बांधतात. ती आपल्या अंड्याचा आणि कोवळ्या पिल्लांचा नेटीने सांभाळ करते.लोककथांमध्ये सुद्धा ,सर्व सजीवांना चतुर आणि हुशार अशी सामान्य व्यक्ती मानलं जातं. बालकांना आता दाखवायला सुद्धा चिमण्या दुर्लभ झालेल्या आहेत.त्यामुळे मला हे पक्षी वाचवायचे आहेत.
2 मानवी लोकसंख्या वाढली आणि घराची गरज वाढल्यामुळे ,माणसांच्या अधिवासासाठी अन्यांचा अधिवास नष्ट झाला.(झाड तोडली,जंगल हटवली) पर्याय आणि परिणामाने
प्राण्यांचा आणि किटकांचा देखील अधिवास धोक्यात आला.मी याबाबत जनजागृति केली. .
3 प्रगती?:मानव मोठा झाला ,मोबाइल टॉवर वाढले.त्या कंपनांनी पक्षी दूर उडाले.
मानव शहरात आला की त्याच्या जबाबदाऱ्या,मागण्या आणि हाव वाढते .गाडी हवी .गाडी पार्किंगला जागा हवी .म्हणून झाड तोडली जातात, आणि झाडावर अवलंबून असलेले अनेक पक्षी प्राणी कीटक नष्ट होतात. मी गाडी वापरण्या ऐवजी,public transport वापरते इंधन बचत होते आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबतो
4 लोकसंख्या आटोक्यात आणणे अतिशय आवश्यक आहे. मी त्या बाबतीत जनजागृती करते आणि त्या विषयावर सतत लिखाण करते
5 पाणीटंचाई: सिमेंटचे आवार आणि रस्ते,यामुळे पाणी झिरपत नाही.झाड झुडप कमी झाली.अवकाळी पाऊस,तापमान वृध्दी हा त्या झाड तोडण्याचा दुष्परिणाम आहे.
जंगल वाचवू या
ऊन वाढले डोक्यावर,
झाडे पाण्याने शिंपु या,
हिरवे डोंगर वाचवु या !जंगल वाचवायचे दिवस आणि झाडे लावायचे दिवस हे वर्षातले बारा महिने 13 काळ असतात .
6 plastic टाळणे:मी बाहेर जाताना हमखास तांब्याची अथवा स्टीलची पाण्याची बाटली,डबे नेते. ज्यामुळे प्लास्टिकच्या बाटल्यांचे प्रदूषण पण होत नाही आणि हे नेलेलं पाणी मी वाटेत सुकत चाललेल्या एखाद्या झाडाला घालते .
7आपण मात्र सिमेंटच्या जंगलाच कौतुक अधिक करतो.एकाच झाडाला लागेल,एवढ्या जागेत,उभी,मियावाकी पद्धतीने,उभी/कमानीदार झाडे लावायला हवी.मी तशी लावते. हवेतील ऑक्सीजन वाढतो,सजीव सहजीवन वाढते.
8 या फळझाडांवर पक्षी येतात. फुलांचं परागीकरण करण्यास देखील पक्षी उपयोगी पडतात.पक्षी कीटक खातात म्हणून शेतात किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. फळ आपल्याला खाता येतात.
7झाड नाहीत, तर मानवाला अन्न नाही . झाडं नसल्यामुळे आणि मानववस्ती दाट झाल्यामुळे,तापमान वाढले. पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे. पर्यावरण शिक्षणाने हे समजू शकते
8 मी घरून जाताना नेहमी कापडी पिशवी नेते प्लास्टिकचे डबे वापरत नाही प्लास्टिकच्या बाटल्या वापरत नाही त्या ऐवजी स्टीलचीच बाटली आणि स्टीलचे डबे वापरते
8 पाणी वाचवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करायला हवा हे मी सर्वांवर ठसवते. जल हे जीवन आहे!
जल जो न होता तो ये जग जाता जल! म्हणजे पाण्या वाचून किती जगात मुश्किल होईल हे आपल्याला कळायला हवं .असं म्हणतात पुढचं महायुद्ध पाण्यावरून लढले जाईल.आज इतकी पाणी बचतीची आवश्यकता आहे .मी करते.जल
संवर्धन, निसर्गचक्रातलं त्यांचं महत्त्व याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रम, उपक्रम आयोजित करते.
9 वीज निर्मितीमध्ये सुद्धा प्रचंड ऊर्जा ऱ्हास होत असतो कारण की एका ऊर्जेतून दुसऱ्या ऊर्जेमध्ये परावर्तित करून वीज बनत असते . या प्रक्रियेमध्ये कार्बन फुटप्रिंट येत असतं .त्यामुळे विजेची बचत करावी.मी करते .
10 रिन्यूएबल एनर्जी चा उपयोग करावा त्यात सोलर आणि विंड एनर्जी या दोन गोष्टी विनामूल्य आहेत .योग्य तो तकनीकी बदल करून सुधारणा करून आपण विजेचा वापर कमी करू शकतो.
11सूर्यप्रकाशाच्या वापरावर अन्न शिजवणाऱ्या सौर्य चुली अथवा सौर्य कुकर सोलर कुकर वापरावे. सोलर दिवे वापरावे मी याबाबतीत भरपूर जनजागृती करते.माझ्या घरी सुद्धा मी सोलरचा दिवा आणून ठेवला आहे .जो इन्व्हर्टर ऐवजी लाईट जाताच आपण वापरू शकतो.
12सोसायटीमध्ये सुद्धा ,म्हणजे रहिवासी संकुलात सुद्धा मी वारंवार आपल्या बिल्डिंगचीचे सर्व लाईट हे सोलरवर करावे .
13 कुठल्याही कार्यक्रमाच्या वेळी भेटवस्तू देताना मी झाडाचे रोप द्यायचा प्रयत्न करते किंवा कुंड्या पक्ष्यांना आंघोळ करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारची मातीची भांडी , अन्य पक्षांना खाद्य देण्यासाठी बर्ड फिडर ,कृत्रिम घरटी भेट देते.
14 मानवी वस्ती ग्रामीण आणि शहरी भागात देखील पाणी बचत करण्याचे संदेश देते.तसे प्रयत्न सुरू झाले आहेत.
15 एकूणच पर्यावरणाचे ऱ्हास थांबवण्यासाठी काही संस्थांचे कार्यक्रम असतात .अशा अनेक प्रकल्पात स्वयंसेवक म्हणून पर्यावरणीय शिक्षण द्यावे.
16 झाड लावले,कि जगवते.
17 मियावाकी या पद्धतीमुळे झाडांना पाणी कमी लागतं आणि तशी लागवड सुरु झाली आहे.
18 देशी झाडं आहेत जी हजारो वर्ष ह्या,देशी मातीशी तडजोड करून जगत आहेत. त्या झाडांच्या वाढीमुळे प्राणी पक्षी आणि कीटक ही लोकल इकोसिस्टीम,मी वाढवते. झाडांशी माणसाचं सांस्कृतिक आणि भावनिक पण नातं असतं .
19 त्यामुळे आधी झाड आणि जंगल वाचवलं की आपोआपच मधमाशा,जनावर, वाघ सिंह चिमण्या कीटक वाचवले जातील. निसर्ग /जंगल वाचवू या म्हणजे पक्षी वाचवले जातील .
20 अन्न सुरक्षा:मधमाशा फळफुलं झाडांची पाने,भाज्या या सर्व गोष्टींची वृद्धी ,ही समृद्ध अधिवासावर अवलंबून आहे .या निसर्ग सहकाराने बनवणाऱ्या पदार्थांवरून माणसाचे अन्न बनत .
21 निसर्ग माणसाला आवाज देत असतो आणि निसर्गाच्या आनंददायी सहवासातील ,छोटा मोठा आनंद माणूस घेतो.सहली,सुट्टीत फक्त निसर्ग रम्य सहली कराव्यात
जंगल बचाना है ,
जंगल मे बैठना है ,
जंगल मे पेड लगाना है,
जाकर उस मिट्टी को छुना है !
22 विद्यार्थ्यांमध्ये ,पुढील पिढीमध्ये निसर्ग पर्यावरण शिक्षण रक्षण बद्दल जागरूकता निर्माण व्हायला पाहिजे.
23 मी एकदा अमेरिकेत बघितलं होतं ,खड्डा खणून त्या खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचवतात आणि बाजूच्या झालेल्या मातीच्या ढिगार्यावर अन्य झाडे लावता येतात. ज्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग पण होतं आणि झाड पण अधिक चांगली जगतात.तसा सल्ला मी देते.
24 क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. नुसतं घोषणा करुन,पर्यावरण वाचवा हे ईतरांना सांगून उपयोग नाही. प्रत्येकाने पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्याची सुरुवात स्वतःपासूनच करायला हवी .
काय करावे?
1 चिमण्यांसाठी अंगणात पाणी ठेवायला हवं.
बाजरी,भात काही खायला ठेवावे.
3 Bird feeder सांगा.
4 पक्ष्यांसाठी असलेली कृत्रिम घरटी टांगावी .
5भेट वस्तू देताना झाडांची रोप पक्षांना आंघोळ करण्याची /पेय जलाची भांडी, पक्ष्यांसाठी बर्ड फिडर अथवा कृत्रिम घरटं या वस्तू भेट देत जाव्या .
6 भेट देतानाच कुंडी सकट देशी झाड द्यावं .म्हणजे एक जरी झाड वाढलं तरी तेवढे पर्यावरणाला फरक पडेल.
7 फिरायला,सकाळ फेरीला जाताना,बाटलीतून पाणी न्यावे,झाडांना घालावे
8 सहलीला जाताना बी बियाणे न्यावे,अन्यत्र पेरावे.
9 वेगवेगळी झाडे लावायला हवी .
कायम सोबत स्टीलची पाण्याची बाटली आणि कापडाची पिशवी सोबत ठेवावी म्हणजे प्लास्टिकचा वापर टाळता येतो रहिवासी संकुलांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचे पाणी साठवण्याची पद्धती सुरू करावी पाणी पुनर्वापर करून वापरावे ज्याने पाण्याची बचत होईल कचऱ्याचं ओला कचरा सुका कचरा असं वर्गीकरण करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी निसर्गाला मित्र समजून सहकार करत समृद्ध ठेवायला हवं.
निसर्गाची हाक मी मनापासून ऐकली आहे आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी पर्यावरणीय शिक्षण महत्त्वाचे आणि आवश्यक आहे.
**
scpaseband@gmail.com
9869004712
