पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

वाढदिवसानिमित्त......

माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने…..

"सस्नेह जयहरी!
खरं तर हा रोजच्या सारखाच एक दिवस! माझा वाढदिवस साजरा करायला मला मनापासून कधी आवडलं नाही. केक-कॅंडल्स, आकर्षक शुभेच्छा यांपेक्षा मला नेहमीच अंतर्मुख करणारी शांत भावना अधिक प्रिय वाटते. वाढदिवस म्हणजे फार तर स्वतःच्या आत विशेषत्वाने डोकावण्याचा दिवस. 

मला कुटुंबीय, शिक्षक, नातेवाईक, मित्र, सहकारी, श्रीगुरूंचा शिष्य परिवार, विद्यार्थी अशा असंख्य प्रेमळ व्यक्तींचा सहवास लाभतोय. अपवाद वगळता संपर्कात आलेलं कुणीही दूर गेलं नाही. हे नातं टिकवण्याचं कौशल्य, ही संवेदना, अंबाबाईनं दिलेली देणगी आहे, असं मला नेहमी वाटतं. एकदा हृदयाशी जोडले गेलेली माणसं आयुष्यभर संगतीत राहतात, हे प्रयासाचं नव्हे, तर प्रसादाचं फळ आहे.

 केवळ वयाचा एक अंक पुढे सरकण्यापेक्षा आंतरिक समाधान ओसंडून वाहावं, यासाठी नोकरीशिवायचा अधिकाधिक वेळ आपल्या आवडत्या कार्यासाठी द्यावा, असा प्रयत्न असतो. अंबाबाई, श्रीगुरुमहाराज, मारोतीराय, श्रीपंढरीश मायबाप या सर्व दैवी शक्तींच्या कृपेने आणि आशीर्वादाने हे शक्य होत आहे. माझ्याकडे जे जे उत्तम आहे, ते भगवत्कृपाप्रसादामुळे आणि तुमच्या शुभेच्छांमुळे!

सर्वांचे मनापासून आभार. मित्रांच्या सहकार्याने, थोरांच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या विश्वासाने समृद्ध आहे. हे मी केलंय, असं म्हणायला मन आता धजत नाही, हे भगवंतांनी करवून घेतलंय, असं मनोमन वाटतं. ही निरभिमानस्थिती क्षणोक्षणी संवर्धित व्हावी, यासाठी आपल्या शुभेच्छा हव्यात.

आजचा संकल्प खूप साधाय, पसारा वाढवायचा नाही, पिसारा फुलवायचा.

उठाउठी अभिमान । जाय ऎसें स्थळ कोण ॥१॥
तें या पंढरीस घडे । खळां पाझर रोकडे ॥२॥
नेत्रीं अश्रूचिया धारा । कोठें रोमांच शरीरा ॥३॥
तुका म्हणे काला । कोठें अभे देखिला ॥४॥

या निमित्ताने तुम्हा सर्वांना एकच शब्द, हार्दिक धन्यवाद! माऊली की जय! जय श्रीकृष्ण!"

चंसो.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू