पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

क्षणभंगूर

""आयुष्य क्षणभंगुर आहे…



विमान धावपट्टीवर सरकत होतं…

खिडकीबाहेरचं शहर हळूहळू लहान होत चाललं होतं, आणि आत बसलेली माणसं – कुणी पहिल्यांदाच विमान प्रवास करत होतं, कुणी रोजचं… पण प्रत्येकाच्या मनात एक समान भावना होती – "पोहोचल्यावर फोन करतो… वाट पाहू नकोस."


कुणी आईला टेक्स्ट केला, कुणी पत्नीला शेवटचा फोटो पाठवला. कुणी ऑफिसच्या ग्रुपवर “Take off ✈️” असा मेसेज टाकला… आणि कुणीतरी मनातल्या मनात एक प्रार्थना केली – "सगळं नीट होऊ दे."


पण त्या क्षणात, काळाने आपली योजना आखली होती.


एक मोठा आवाज, आगीचे ज्वाळा, आणि एका क्षणात सगळं संपलं.


पिशव्या, पासपोर्ट, मोबाईल, घड्याळं – सगळं जागेवर होतं… फक्त माणसं नव्हती. उरली फक्त धूर, राख, आणि त्यांच्या मागे पडलेली माणसांची वाट पाहणारी नजर…


त्या फोनवरचे शेवटचे मेसेज अजूनही वाचले गेले नाहीत.

"Call me when you land..."

"Miss you already..."

"Take care..."


कुठे रडणारी आई होती, कुठे गोंधळलेली मुलं, कुठे फोन कट झाल्यावर अजूनही “Hello… Hello?” म्हणणारा कोणी तरी.


कोणीच ठरवत नाही की शेवटचा टेक्स्ट कोणता असेल, शेवटची मिठी कोणती असेल, शेवटचा शब्द कोणता असेल…



आज जे गेले, त्यांच्या हसण्याच्या प्रतिध्वनी अजूनही कुणाच्या आठवणीत जिवंत आहेत.काल जे हसत-खिदळत आपल्याबरोबर होते, आज एका अपघाताने, आजाराने, अचानक घडलेल्या घटनेने निघून जातात… आणि आपण अवाक होतो. मग वाटतं, एवढं सगळं करून, धावपळ, राग, मत्सर, स्पर्धा—शेवटी काय उरलं?




त्यांनी मागे ठेवलेली स्वप्नं, आवाज, माणुसकी – हे सगळं आपल्याला एकच गोष्ट सांगतं...

 "आयुष्य क्षणभंगुर आहे…

त्यामुळे प्रत्येक क्षण जगा – प्रेमाने, माफ करत, आणि अगदी मनापासून."आज आपण साठवतोय—पैसा, मालमत्ता, पद, अहंकार… पण आयुष्य एक झराच आहे—हळुवार वाहणारा, कोणताही अलार्म न देता संपणारा. आणि जेव्हा संपतो, तेव्हा आपण म्हणतो, “अजून थोडं वेळ मिळालं असतं तर…”


म्हणूनच,


> प्रत्येक दिवस म्हणजे एक गिफ्ट आहे… त्यालाच "Present" म्हणतात.




आयुष्य क्षणभंगुर आहे—हे लक्षात ठेवा म्हणून…


कधी भांडणं सोडून द्या.

कारण समोरचा माणूस उद्या असेल याची खात्री नाही.


माफ करा आणि मोकळं व्हा.

राग साठवून मन काळं करू नका.


"आय लव्ह यू" म्हणायचं राहून जाऊ देऊ नका.

कारण पुढच्या क्षणी संधी मिळेलच असं नाही.


तुमचं मन सांगेल ते करा,

कारण प्रत्येक दिवस "नवीन" आहे, पण "शाश्वत" नाही.



जीवनाचा एक गोड सल्ला:


"थांबा... श्वास घ्या... एखाद्याला मिठी मारा... आईला फोन करा... आणि स्वतःला सांगा, तू चांगलं जगतोयस."




कारण अखेर…

"जगणं हे क्षणभंगुर असलं, तरी ते सुंदर असावं, हसतमुख असावं, आणि माणसांत मिसळलेलं असावं."



एक 🙏🏽नम्र श्रद्धांजली त्या सर्व आत्म्यांना –🙏🏽

ज्यांनी आजच्या विमान दुर्घटनेत आपले प्राण गमावले.

मृत्यू अटळ आहे… पण तो येईपर्यंत

‘मृत्यूशिवाय’ जगणं, हेच खरं आयुष्य आहे.


सौ तृप्ती देव 

भिलाई छत्तीगड 





🙏 नम्र श्रद्धांजली –🙏🏽

त्यांना जे अचानक काळाच्या प्रवाहात हरवले.

नावं नकोत… कारण हळव्या आठवणींना फक्त मन लागतं… ओळख नाही.


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू