पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सोमनाथ मंदिर,रहस्यमय ज्योतिर्लिंग आणि त्याचा इतिहास.......

सोमनाथ मंदिर,रहस्यमय ज्योतिर्लिंग आणि त्याचा इतिहास.......

 

 इतिहासामध्ये भारतावर अनेक आक्रमण झाली. अफगाणिस्तान मंगोलिया, इराण, इराक यासारख्या देशातून आलेल्या कट्टर मुस्लिमवादी राज्यकर्त्यांनी भारतातील अमाप संपत्ती लुटली, ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी आपली भारतीय संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न केले, हजारो मंदिरांची नासधूस केली.

 परंतु भारतातून हिंदू संस्कृती नष्ट करण्यात कोणालाही यश आले नाही.

 

भारत हा देश अतिशय प्राचीन अशा  संस्कृतीचा देश आहे. हजारो वर्षांपूर्वी भारतामध्ये हिंदू संस्कृती उदयाला आली होती. वेद,विज्ञान, स्थापत्य, कला, आरोग्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये संस्कृतीने अगणित विकास करून वेगळ्या प्रकारची उंची त्या काळात गाठली. 

 

सोमनाथ मंदिर आणि त्याचे ज्योतिर्लिंग हे याच संस्कृतीचं एक मूर्तिमंत उदाहरण!!

 

सोमनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे सर्वामध्ये पहिले ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते, कारण त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हे मंदिर इतके प्राचीन आहे की याचा उल्लेख वन पर्वत मधील महाभारत ( इ. स. 400 ) व भागवत पुराण मध्ये सौराष्ट्राच्या किनारपट्टीवरील तीर्थ असा आहे. या मंदिराला 'सोरठी सोमनाथ मंदिर 'असेही म्हटले जाते.

 

मंदिराचे स्थान....

 

 हे मंदिर गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशातील वेरावल जवळ प्रभास पाटण येथे समुद्रकिनाऱ्यालगत आहे. प्रभास पाटण ची जागा हिंदू संस्कृतीत 2000 ते 1200 B. C. दरम्यान व्यापली गेली. जुनागड जिल्ह्यातील काही मोजक्या ठिकाणांपैकी हे एक होते. 1200 BCE मध्ये काही काळ ओसाड पडल्यानंतर 400 BCE मध्ये ती पुन्हा वापरात आली आणि हा ऐतिहासिक कालखंड चालूच राहिला.

 

 सोमनाथ मंदिरावर झालेली आक्रमणे........

 

 सोमनाथ मंदिरावर वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी, मुस्लिम शासकांनी मंदिराच्या स्थापनेपासून एकूण 17 वेळेस हल्ले केले गेले आणि या मंदिराला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला.

 

पण प्रत्येक हल्ल्यानंतर हे मंदिर पुन्हा उभे राहिले.

 

पहिल्यावेळी उद्ध्वस्त झालेल्या मंदिराला वल्लभीचे यादव राजांनी इसवी सन 649 मध्ये पुन्हा बनवलं, परंतु इसवी सन 725 मध्ये सिंध प्रांताचा सुलतान अल जुनेद याने पुन्हा नष्ट केल.

 

 नंतर गुर्जर प्रतीहार वंशाचे राजा नागभट्ट द्वितीय यांनी इसवी सन 815 मध्ये तिसऱ्यांदा शिव मंदिराची रचना केली. यावेळी या मंदिराची रचना करताना लाल बलूआ दगडांचा वापर करण्यात आला. नागभट्टद्वारे बांधलेल्या या मंदिराचे ऐतिहासिक पुरावे सापडले आहेत.

 

 त्यानंतर चालुक्य राजा मूलराज ने इसवी सन 997 मध्ये या मंदिराचे पुन्हा नूतनीकरण केलं.

 

 गझनीचा महमूद आणि सोमनाथ मंदिर हल्ला...

 

हा अफगणिस्थानातील गझनीचा अतिशय क्रूर आणि कपटी शासक होता. भारतात येऊन हा लूटपाट करायचा. त्याला भारतावर सत्ता प्रस्थापित करण्याची इच्छा नव्हती, त्याचा उद्देश फक्त लूटपाट,हिंदू संस्कृतीचा नाश आणि हत्या हा होता. ह्याने कित्येक संपत्ती त्या काळात लुटली.

याने भारतात 17 वेळा लुटीच्या मोहिमा आखल्या.

इसवीसन 1026 मध्ये सोमनाथ मंदिराला  महमूद गजनवीने तोडलं. या हल्ल्यात त्याने सर्वात जास्त मंदिराचे नुकसान केले.

 त्या काळी मंदिरात असलेली सगळी संपत्ती जवळपास वीस बिलियन 

 दिनार लुटून त्याने मंदिराला आणि हवेत तरंगणाऱ्या अदभूत अशा ज्योतिर्लिंगाला तोडून टाकले.हे शिवलिंग भारतीय  स्थापत्यकलेचे एक उत्तम उदाहरण होत. मंदिराच्या बचावासाठी आलेल्या पन्नास हजार लोकांची ह्या गजनवीने त्या काळी हत्या केली होती, इतका हा क्रूर होता.

 

 या हल्ल्यानंतर राजकुमार पालने इसवी सन 1169 मध्ये उत्कृष्ट दगडातून या मंदिराची पुनर्रचना केली, 

पण अल्लाउद्दीन खिलजीने  इसवी सन 1299 मध्ये पुन्हा या मंदिराला नष्ट केल.

 इसवी सन 1308 मध्ये सौराष्ट्राचे राजा महिपाल यांनी पुन्हा या मंदिराची स्थापना केली. 

 

  गुजरातचा सुलतान मुजफ्फरशहा याने  इसवी सन 1395 मध्ये मंदिराला संपूर्णपणे लुटलं व पुन्हा एकदा नष्ट केल.

 

 मंदिरावर होणारे हल्ले अजूनही थांबलेले नव्हते. ज्या ज्या वेळी आक्रमण झाली , त्या त्या वेळी सोमनाथ मंदिराला लक्ष केलं गेलं.

 

 सुलतान मुजफ्फर शहा याचा मुलगा अहमदशहा याने इसवी सन 1412 मध्ये पुन्हा मंदिराची राख रांगोळी केली.

 

इसवी सन 1665 मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाने सुद्धा मंदिराला अशा पद्धतीने नष्ट केलं की या मंदिराची पुनर्रचना होऊच नये, त्यानंतर इसवी सन 1706 मध्ये या मंदिराच्या स्थानावर एक मशिद बनवण्यात आली, मात्र 1950 मध्ये मंदिराच्या पुनर्रचनेच्या दरम्यान या मशिदीला तिथून हटवण्यात आलं.

 मंदिराच्या पुनर्रचनेसाठी महाराष्ट्राच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांचेही खूप योगदान आहे, इसवी सन 1783 मध्ये पुण्याच्या पेशव्यांसोबत मिळून विखुरलेल्या सोमनाथ मंदिराजवळ वेगवेगळ्या मंदिरांचे निर्माण अहिल्याबाईंनी केले, त्यांनीच या मंदिराचा गर्भाशय जमिनीच्या आत बनवला जेणेकरून महादेवाला विध्वंस शक्तीपासून दूर ठेवले जाव. या मंदिराला जुन सोमनाथ मंदिर किंवा अहिल्याबाई मंदिर म्हणून ओळखले जाते.

 

बाण स्तंभ   :

 सोमनाथ मंदिराच्या परिसरात सर्वांना अचंबित करणारा एक स्तंभ( खांब) आहे . या स्तंभाची निर्मिती इसवीसन सहाव्या शतकात झाली असावी असं काहीजण म्हणतात.  या स्तंभाला " बाणस्तंभ " असे म्हणतात, कारण त्यावर समुद्राच्या दक्षिण दिशेने बाण असलेले चिन्ह दाखवलेले आहे, शिवाय या स्तंभावर 

"आसमुद्रात दक्षिण ध्रुवपर्यंत, अबाधित ज्योतिमार्ग " असे संस्कृत मध्ये  लिहिलेले आहे. याचा अर्थ असा आहे की समुद्राच्या या बिंदूपासून दक्षिण ध्रुवापर्यंत कोणताही भूभाग नाही.

 आधुनिक तंत्रज्ञान नसतानाही भारतीयांना या स्तंभाच्या माध्यमातून पृथ्वीच्या संरचनेची  आणि खगोलीय ज्ञानाची माहिती होते हे समजते विशेष म्हणजे या बिंदूपासून दक्षिण ध्रुवापर्यंत कुठेही जमीन नाही हे सहाव्या शतकामध्ये कोणत्याही प्रकारचं तंत्रज्ञान नसताना त्यांना ही माहिती कशी मिळाली असेल?

 याचाच अर्थ त्या वेळच्या लोकांना पृथ्वीचा दक्षिण ध्रुव कोणत्या बाजूला आहे हे सुद्धा माहिती होते,

 

 चुंबकीय शिवलिंग. :

 

 सर्वात रहस्यमय आणि आश्चर्यचकित करणारी वस्तू त्या ठिकाणी होती तर ती म्हणजे सोमनाथ मंदिरातील प्राचीन शिवलिंग!!

 सोमनाथ मंदिरातील हे प्राचीन शिवलिंग चुंबकीय गुणांमुळे हवेत तरंगत असे.

 महमूद गजनवीने  हल्ल्यात त्या शिवलिंगाचे तुकडे केले, त्यावेळी मंदिरात पूजा करणाऱ्या अग्निहोत्रींनी त्या शिवलिंगाचे तुकडे आपल्या जवळ  लपवून ठेवले.  त्यानंतर ते दक्षिणेकडे घेऊन आले व त्यांनी त्या पैकी काही तुकड्यांचे शिवलिंगाचे आकार बनवले. इसवी सन 1924 मध्ये एका अग्निहोत्रीनी  जगद्गुरु श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती (1894-1994)यांच्याकडे जाऊन त्यांना विचारलं की या शिवलिंगाचं आम्ही काय करू?

 त्यांनी सांगितलं, "तुमच्याजवळ हे जे शिवलिंग आहे त्याबद्दल आज पासून शंभर वर्ष कुठेही बोलू नका, त्याला तुमच्या जवळच ठेवा, त्यांची पूजा करा. काही वर्षांनी भारत स्वतंत्र होईल, त्यानंतर राम मंदिराचे निर्माण होईल, त्यानंतर तुम्ही त्याला बाहेर काढा. ".त्यानंतर ते  पुढचे शंकराचार्य जे होते त्यांच्याशी बोलले,तसेच जे सध्याचे शंकराचार्य विजेंद्र सरस्वती स्वामीगल  आहेत त्यांच्याशीही बोलले. त्यांनी त्यांना हे शिवलिंग श्री श्री रविशंकर (बेंगलोर ) यांच्याकडे सुपूर्त करण्याचे आवाहन केले.  त्यांच्या सांगण्यावरून या ब्राह्मण कुटुंबातील पुजारी सीतारामण शास्त्री यांनी जानेवारी 2025 मध्ये हे शिवलिंग श्री श्री रविशंकर यांच्याकडे सुपूर्त केले.

 

 कारण हे जे शिवलिंग होतं हे काही साधारण नव्हतं, त्याच्या आत मध्ये चुंबकीय शक्ती होती. आणि तज्ञांच्या मते असा कोणताही दगड किंवा चुंबक पृथ्वीवर उपलब्ध नाही,एकतर ही संपूर्ण शिळा कदाचित पराग्रहावरील असू शकते. हया शिवलिंगाची तुकडे  1000 वर्ष जपून ठेवण्यात आली होती.

 आता याच शिवलिंगाची प्रतिष्ठापना  सोमनाथ मंदिरात करण्यात येणार आहे.

- प्रकाश फासाटे.मोरोक्को.

212661913052

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू