मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
सर्व प्रथम ज्यांनी ही योजना चालू केली त्यांना मी थँक्यू म्हणणार आहे... कारण ही तसंच आहे, कारण आयुष्यात मला पहिल्यांदा स्वतःचे पैसे आहेत म्हणून हक्क गाजवता आला..
तर मी आता तुम्हाला माझ्याबद्दल सांगते. लहानपणापासून माझं शिक्षण गरिबी मध्ये झालं, तसं पाहायला गेलं तर आम्ही जास्त गरीबही नव्हतो आणि जास्त श्रीमंत ही मिडल क्लास म्हणता येईल.. खूप म्हणता मी एम एस सी केमिस्ट्री मध्ये केली .
शाळेत पहिल्यापासून हुशार असल्यामुळे शिक्षणाच्या आवड असल्यामुळे घरच्यांनी मला खूप शिकवलं. लहानपणापासून एकच स्वप्न होतं की काही करून जॉब करायचा... स्वतःच हक्काच का असा ना पन्नास रुपये कमवायचे...
जास्त काही श्रीमंत होण्यासाठी किंवा खूप पैसा मिळवावा असं काहीच नव्हतं... शिक्षण झाले आणि खूप ट्राय केला जॉब नाही भेटला... सुशिक्षत बेरोजगार राहिले म्हणता येईल.... त्या नंतर लग्न झाले तरीही नाही भेटला त्या नंतर ही resum खूप पाठवले पण काहीच नाही झाले... शेवटी नशीब कधी कधी साथ देत नाही...
स्वतः च १००रुपय कमवायचे राहून गेले...
माझ्या लग्नानंतर शहरात राहू लागले...
पण houswife म्हनून... खूप वाईट वाटायचं ...
त्या नंतर मुलगा झाला आणि जबाबदारी ही वाढली... आणि स्वप्न स्वप्नच राहून गेले...
बघता बघता ७ वर्ष होऊन गेली.... एक मना मध्ये दुःख होत की मी काहीच करू नाही शकले... आणि मग एक दिवस लाडकी बहीण योजना चालू केली... आणि कधी नाही ते माझ्या अकाउंट मध्ये पैसे आले... ते माझे होते... तेव्हा माझ्या नवऱ्या ला म्हणू शकले.. माझे आहेत... हवे तसे खर्च करू शकते... शेवटी मला माहिती होत की ते माझ्या कष्टाचे नाहीत... पण थोडा का आनंद मनाला झाला...
कस असते ना तुमचा नवरा भाऊ किंवा वडील कितीही मोठ्या जॉब ला असेनात पण आपण जेव्हा त्याचे पैसे खर्च करतो तेव्हा एक एक रुपयाचा हिशोब द्यावा लागतो,
पण तेच जर आपले असते तर आपण आपल्या फ्रेंड्स असो किंवा आई वडील कोणासाठी ही कधी ही काही ही घेऊ शकतो.. असो..
ही योजना आली आणि हक्काचे पैसे आले...
पण जूनचा हप्ता नाही आला... थोडे वाईट वाटले... असो नशिबात असेल तर कोणी घेऊन जात नाही..
आणि माझ्या पेक्षा जास्त गरज असेल त्याला भेटू दे बस झालं आणखी काय हवे..
पण मला कमवायचे आहेत.. आज ना उद्या मी कमवणारच... खूप कष्ट करणार... कष्टाच्या पैशात जेवढा आनंद आहे तो काही वेगळा च असतो... आणि तो आनंद मी मिळवणारच...
