पद्मदुर्ग शिवरायांचा जलदुर्ग बांधणीतील उत्कृष्ट नमुना
"पद्मदुर्ग "
शिवरायांचा जलदुर्ग बांधणीतील उत्कृष्ट नमुना पण दुर्लक्षित राहिलेला.
छत्रपतींचा पद्मदुर्ग जागर २०२६ सोहळ्यात दरवर्षी प्रमाणे शिवप्रेमी म्हणून मी ही हजेरी लावली. तेव्हा माझा अनुभव आपणांस कळावा म्हणून थोडक्यात...
*पद्मदुर्ग* म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी *जंजिऱ्याच्या उरावर वसवलेली दुसरी राजपुरी* . महाराज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भुमीला नतमस्तक होण्यासाठी तसेच या पद्मदुर्गासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या मावळ्यांना नमन करण्यासाठी *चला पद्मदुर्ग पहायला* .
मुरुडचा जंजिरा आपल्याला माहीत आहे पण पद्मदुर्ग सांगावा लागतो हे आपले दुर्दैव आहे. म्हणूनच पुढील पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीकोनातून अत्यंत कठीण परिस्थितीत परंतु मोक्याच्या जागेवर बांधलेल्या या जलदुर्गाची महती ऐकण्यासाठी व दाखविण्यासाठी आम्ही
स्थानिक पद्मदुर्ग जागर समितीसोबत पद्मदुर्गाचे जागरण करत आहोत. चला आपणही या पद्मदुर्ग जागृतीचे पाईक होऊयात.
*आम्ही स्वच्छंदी फौंडेशनच्या* वतीने *पद्मदुर्ग जागृती अभियान* चालविले आहे. या अभियानांतर्गत आपणास अत्यल्प शुल्क घेऊन या पद्मदुर्ग जागृती अभियानात सहभागी करुन घेतले जाते.
*रविवार दिनांक ११ जानेवारी रोजी पद्मदुर्ग मुरुड जिल्हा रायगड येथे हा पद्मदुर्ग जागरणाचा सोहळा संपन्न झाला*. महाराजांची पालखीने मिरवणूक , दुग्धाभिषेक , दुर्ग पूजन , महाराजांची आरती अशा ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पद्मदुर्ग पहाण्यासाठी मुंबईहुन वीस जण गेलो होतो.किमान प्रवास शुल्क आम्ही यात बस व बोटीचे पैसे सामाविष्ट घेतले होते. कार्यक्रमात दुपारी आरती नंतर महाप्रसादाचे आयोजन होते.नंतर भरती अगोदर दुपारी २. ३० नंतर परतीचा प्रवास, मुंबईत परत असें आयोजन होते.
एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी "आम्ही स्वच्छंदी फौंडेशनच्या" वतीने राबविण्यात येणाऱ्या *पद्मदुर्ग जागृती अभियान* जास्तीत जास्त शिवशंभू भक्तांना *छत्रपतींचा पद्मदुर्ग* पहायला घेऊन जाते. त्याच प्रमाणे ७५०/-₹ रुपये शुल्क* घेऊन आपण पद्मदुर्ग जागृतीसाठी सर्वांना याहीवर्षी नेले होते. शुल्कात फक्त *बस आणि बोट* यांचेच शुल्क घेण्यात येते. याव्यतिरिक्त जो काही खानपान व इतर खर्च असेल तो स्वतः करायचा असतो. याला आम्ही TTMM (तुझे तू माझे मी )तत्व म्हणतात.
आमच्या समूहात *महिलांची काळजी घेणे हे आमचे परम कर्तव्य आहे*. म्हणूनच आम्ही सकाळी पोहोचल्यावर फ्रेश होण्यासाठी रुम बुक केलेली होती यात आम्हीं पद्मदुर्गाकडे जाताना आपले सामानही ठेवू शकलो.
आमच्या ग्रुप मध्ये पद्मदुर्ग जागर साठी ११ जानेवारी २०२६ ला १९ सदस्य झाले होतो यात६ महिला होत्या.
आमची २० सीटर बस आधीच बुक करुन ठेवलेली होती. या सदस्यांमध्ये
अमित घाटये सर आमचे लीडर, शरण पाटील,जय माळी , शशांक वस्कर , रजनी कवठणकर, वामन धुरी, मंदार ओगले , पुनम ओगले, नीरव ओगले, निनाद ओगले, प्रांजल मडवी, पुर्वा मडवी, भारती गोडबोले, शिल्पा झावरे, मकरंद वेंगुर्लेकर, किशोर जाधव, अविनाश येवले, देवेश नाईक आणि मी लव क्षीरसागर असे होतो.
पद्मदुर्ग जागर सोहळ्या निमित्ताने आम्हीं पद्मदुर्ग, मुरुड मध्ये जंजिरा किल्ला मागे आहे तेथे सकाळी २ वेगवेगळ्या बोटीने पोहोचलो. कठीण आणि धाडसी प्रवास आहे. आम्ही पद्मदुर्ग जलदुर्ग पोहोचलो आणि शिवमय झालो. आमच्यातील नविन लोकांना
*पद्मदुर्गच का?* असा प्रश्न पडला.
अनेकांसाठी *पद्मदुर्ग* हा जलदुर्ग अनभिज्ञ आहे , कारण त्याबद्दल फार कुठे वाचायला ऐकायला मिळत नाही. रायगड जिल्ह्यातील *मुरुड जंजिरा* हा जलदुर्ग मात्र बहुतेक सर्वांनाच माहित असतो. आतातर मुरुड जंजिरा हे पर्यटन दृष्ट्या सुद्धा अतिशय hot destination झालेले आहे. अलिबाग ते मुरुड जंजिरा या ५० किलोमीटर पर्यंतच्या समुद्र किनाऱ्यावर आता पर्यटकांची भरती मोठ्या प्रमाणात आलेली आढळून येते. ही पर्यटकांची गर्दी या सृष्टीसौंदर्यांने नटलेल्या कोकणाचा आस्वाद घेण्यासाठी आलेली असते.
या पर्यटकांना टूर पिकनिक काढणाऱ्या संस्था अलिबाग, किहीम , नागाव , काशिद आणि मुरुड नांदगाव च्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी घेऊन जातात आणि त्यात अधिक जोड म्हणून कुलाब्याचा जलदुर्ग आणि मुरुडचा जंजिरा जलदुर्ग हेच प्रामुख्याने दाखवले जातात.
मुळात पर्यटक हे मजा करण्यासाठी कोकणच्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी येत असतात. त्यामुळे या पट्ट्यात येणाऱ्या इतर ऐतिहासिक वास्तू वा मंदिरं याकडे दुर्लक्ष होते किंवा समुद्रात जास्त वेळ दिल्यामुळे इतर जवळपास असलेल्या महत्वपूर्ण ठिकाणं ठरवली असली तरी रद्द करण्यात येतात.
या पट्ट्यात अलिबागचा कुलाबा किल्ला , नागावला असलेले मराठी भाषेचा पहिला शिलालेख ( जो नुकताच वर्षं दोन वर्षांपूर्वी उजेडात आला आहे ) , चौलची मंदीरं , रेवदंडा किल्ला , कोर्लई किल्ला व दीपस्तंभ , साळावच गणपती मंदिर , चौलच दत्त मंदिर , नांदगावचा सिद्धिविनायक , मुरुड चा जंजिरा , त्यासमोरचा सामराजगड आणि पद्मदुर्ग. याशिवायही भटक्यांसाठी फणसाड अभयारण्य आणि गारंबीचा धबधबा , तळगड , खांदेरी उंदेरी दुर्ग असं बरंच काही निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं पहाण्यासाठी आहे. अर्थात त्यासाठी एक दिवसीय सहल अपुरी पडते. किमान एक किंवा दोन रात्र सहल हवी, तरी यातील मोजकीच ठिकाणं पहाता येतील.
अलिबाग म्हटलं कीं सागरी किनारा तेथील करमुणुकीची साधने, नारळी पोफळीच्या बागा,स्वादिष्ट सुग्रास जेवण आणि जंजिरा किल्ला याकरिता प्रसिद्ध एकदोन दिवसाची सवड काडून कित्येक पर्यटक सहली काढीत असतात. परंतु याच मुरुड मध्ये शिवप्रभुनी कासा बेटावर बांधलेला 'पद्मदुर्ग' किती जणांना माहित असेल सांगता येत नाही. जो समुद्रात दिसतो आहे ना तो हा ' पद्मदुर्ग ' एवढीच काय ती त्याची ओळख.
तसं पाहायला गेलं तर उत्साहाने ' पद्मदुर्ग ' पाहायला जाणारी मंडळी बरीच कमी. त्याला कारण म्हणजे तेथील पर्यटनावर शासनाने केलेलं दुर्लक्ष, उदासीनता आणि पद्मदुर्गावर पर्यटकांना घेऊन जाण्यास बोटवाल्या मंडळींनी दिलेला नकार. त्यामुळे शिवरायांच्या जलदुर्ग बांधणीतील उत्कृष्ट नमुना असलेला ' पद्मदुर्ग ' पाहणे म्हणजे निव्वळ नशिबाचा खेळ असे म्हटले जाते ते अगदी खरे आहे. परंतु ही परिस्थिती आता हळूहळू बदलत चालली आहे.
दर्याला आलेलं उधाण, वातावरणातील अनियमितता व न परवडणारा इंधनाचा खर्च. त्यातून किल्ला पहायला गेलेली मंडळी वेळेत मागे न फिरल्याने होणारा खोळंबा आणि त्यामुळे बोटीवाल्या कोळी बांधवांचा बुडणारा मच्छमारिचा व्यवसाय. तरीही ते सर्वं सहन करीत काही मंडळी ज्यादा पैसे आकारून ' पद्मदुर्ग ' नेण्यास तयार होतात. हा समुद्र आमचा आहे असे म्हणणारी तेथील स्थनिक मंडळी आता हा पद्मदुर्ग आमचा आहे म्हणू लागलीत ही आनंदाची गोष्ट आहे. आता खोरा बंदराकडून छोटया बोटी आणि मुरुड समुद्र किनाऱ्यावरून स्पीड बोटी, खाजगी बोटी पद्मदुर्गावर जाण्यास मिळतात.
या सर्वांत दुर्लक्षित होणाऱ्या *पद्मदुर्ग किल्ला* या जलदुर्गाची मोहीम आम्हीं *पद्मदुर्ग जागृती अभियान* या उपक्रमांतर्गत हाती घेतली आहे.पर्यटनासोबतच आपला इतिहास सगळ्यांसमोर आणण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. मुरुड जंजिरा सर्वांनाच माहित असतो तेथे जाणेही सोपे असते.त्यामुळे सर्वच जंजिरा किल्ला पहायला जातात. सर्व ऐतिहासिक वास्तू पहायला हव्यातच . समुद्रात सुस्थितीत असलेला जंजिरा हा जलदुर्ग नक्कीच पहाण्यासाठी जावे.
पण एकदा का तुम्ही हा किल्ला पहाण्यासाठी गेलात की तुमची तळपायाची आग मस्तकात जाते. याचे प्रमुख कारण म्हणजे येथे बोटीतून आपल्याला घेऊन जाणारा नावाडी किंवा किल्ल्यावर असलेले गाईड हे माहिती पुरवत असतानाच *शिवाजी ने सब किल्ले जिते , लेकीन जंजिरा नहीं जित पाये यह अजिंक्य है* हे बोलतानाची त्यांची देहबोली आणि आवाजातील गुर्मी शिवप्रेमींचे कानशील तापवल्याशिवाय रहात नाही.अशांना जास्त डोक्यावर घेऊ नये.
आपण जंजिऱ्याच्या सिद्दीबद्दल नक्की माहीती सांगा पण त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांकरवी , या *जंजिऱ्याच्या उरावर* समोरच्या टेकाडीवर *सामराजगड आणि पद्मदुर्ग* हा जलदुर्ग अतिशय खडतर वातावरणात बांधून घेतला. तेव्हा सिद्दी सोबतच इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यावरही वचक निर्माण करण्यात आला हे दिसून आले.
हिंदवी स्वराज्यावर चालून आलेल्या पाच पातशाह्यांविरुद्ध लढण्यासाठी वेळ द्यावा लागत असल्याने , खाली कोकणात सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी दोन्ही महाराजांना बराच वेळ द्यावा लागला होता.
मुरुड जंजिरा येथील काही ठराविक लोकं ( मुस्लिम) जे पर्यटकांची व इतिहासप्रेमी नागरिकांची दिशाभूल करत असतात. मुरुड जंजिरा येथून पद्मदुर्गावर जाणाऱ्या बोटी बंद केल्या आहेत किंवा पद्मदुर्गाबाबत विचारल्यावर सरळ काहीच माहिती देत नाहीत.
खोटा इतिहास मुरुड जंजिरा येथील गाईड सांगत असतात आणि कुठल्याही पर्यटन स्थळ वा ऐतिहासिक स्थळावरील गाईड ज्याप्रमाणे आजूबाजूच्या वास्तूंची माहिती देतो , ती न देता केवळ आणि केवळ सिद्दीचा उदोउदो करण्यात हे गाईड धन्यता मानतात.
म्हणूनच 'आम्ही स्वच्छंदी फाऊंडेशन'
'शिवशंभू प्रेमी संघटना' संस्था जास्तीत जास्त लोकांपर्यंत , मुरुड जंजिरा येथील खरा इतिहास उजेडात आणून *महाराजांनी जंजिऱ्याच्या उरावर वसवलेल्या प्रति राजदंडपुरी अर्थात " पद्मदुर्ग" या जलदुर्गाच्या महती मोहीम हाती घेत आहोत. जास्तीत जास्त लोकांना पद्मदुर्ग किल्ला दाखवणे व महाराजांच्या दूरदृष्टीचे दर्शन घडवावे व अजिंक्य ठरलेल्या जंजिऱ्याच्या सिद्दीला जेरीस आणणारा *शिवशंभू काळातील इतिहास उजेडात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
स्थानिक नागरिक पद्मदुर्ग किल्ल्याला कासाचा किल्ला म्हणतात.
या पद्मदुर्ग किल्ल्यावर ' कोटेश्वरी देवी' चे मंदिर आहे. मुरुड ग्रामस्थांनी तिचे गावात मोठं मंदिर बांधले आहे. आणि तिचा पालखी सोहळा पद्मदुर्ग ते मुरुड असा जल्लोषात साजरा होतो.
' कोटेश्वरी ' नावाचं उकल सांगताना अर्थ पाहताना, मूळ कासा या बेटावर पद्मदुर्ग किल्ला बांधला आहे. कासा म्हणजे कासव ( विष्णू रूप) पद्म म्हणजेच कमळ, दुर्ग म्हणजे किल्ला आणि ईश्वरी म्हणजेच देवी. जी त्या पद्मा प्रमाणे बांधलेल्या कोटात विराजमान झाली आहे अशी ती 'कोटेश्वरी '. कमळाच्या पाकळ्या प्रमाणे किल्ला दिसतो. समुद्रात विष्णूचा वास असतो.
आज ही पद्मदुर्ग किल्ल्या मध्ये आई कोटेश्वरी देवी ची पूजा आरती केली जाते. स्थानिक भाविक दर्शनाला जातात.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर नतमस्तक होण्यासाठीच आपण किल्ले *पद्मदुर्ग जागृती अभियान* हाती घेतली आहे. या मोहिमेत आपल्याला त्याकाळी मावळ्यांनी गाजवलेल्या पराक्रमाची माहिती दिली जाईल. त्यांचेही स्मरण यावेळी करण्यात येईल.
आपला खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवा यासाठी हे *पद्मदुर्ग जागृती अभियान* आहे. *छत्रपतींचा पद्मदुर्ग* सर्वांसमोर आणण्यासाठी व जास्तीत जास्त संख्येने शिवशंभू भक्त तेथे पोहोचले पाहिजेत , याचसाठी हा अट्टाहास !!!
मनःपूर्वक आभार
'आम्ही स्वच्छंदी फाऊंडेशन' अध्यक्ष
अमित घाटये सर आणि कोकण कडा मित्र मंडळ, महाड..
जय शिवराय 🙏🏼
एक शिवप्रेमी.
लव क्षीरसागर
: समाप्त :
