कर्नल मोहन
कर्नल मोहन चा मृत्यू :शुभांगी पासेबंद आमच्याबरोबर कॉलेजमध्ये शिकत असलेला, मोहन श्रीमंत घरातील देखणा मुलगा होता.तो सैन्य दलात निवडला गेला.कर्नल मोहन आशर झाला.मोहन याचा परवा झोपेतच मृत्यू झाला. वय सत्तरीच्या आसपास, दिसायला हँडसम आणि फिट !काय घडलं असेल ?या वयात काहीतरी उन्नीसबीस तब्येतीचे प्रश्न असतातच .पण वय 90/ 95 वर्षाच्या व्यक्ती सुद्धा मोठे मोठे ऑपरेशन मधून सही सलामत बाहेर पडतात .निराधार केंद्रात सुद्धा असतात.पण मोहन वरवर आतील निराशा काहीच दाखवत नसे.1999 च्या कारगिल वाॅर बद्दलच्या काही हकीकती त्यांनी आम्हाला गेट-टुगेदरच्या वेळी सांगितल्या होत्या. अतिशय सुंदर माऊथ ऑर्गन वाजवायचा. तो कुटुंब मुले नातवंड यांत खुश होता. एक वर्षापूर्वी एका अन्य मैत्रिणीला कॅन्सर झाला म्हणून तिच्या घरी आम्ही सगळेजण भेटायला गेलो तेव्हा मोहन व्यवस्थित होता .पण तब्येतीबाबत त्याचे आजाराबाबत काही नीट कळलं नाही .तो गेला. .
आनंद या राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातला तो जगप्रसिद्ध डायलॉग आठवा हे जे तुझे शेवटचे वाक्य आहे ना ते परत आठवा.
"जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में है जनाब कौन कैसे कब उठेगा ये सिर्फ उपरवाला ही जानता है !"
मी कधी ची मोहनला खूष असा पहात होते. मोहन चे जाणे आम्हा सगळ्यांना हा मोठा shock आहे .पण त्यातून बाहेर यायला हवं .मला तर सुन्न झाल्यासारखं झालं. म्हणजे काय लिहावं ते सुचेना.3महीन्या पूर्वी, त्याचे military हॉस्पिटल मधून त्यांनी फोन केला होता की त्याच ऑपरेशन, रिपोर्ट मुळे पोस्टपोन झाले. मला कसले ऑपरेशन ते पण कळलं नाही.पण गुढग्याचे असेल तर,मी take care म्हणाले. आपल्या या समूहामुळे मी बरीच आनंदी राहायला शिकले. वाकडी तिकडी चालत ,कशीतरी का होईना,घाबरत घाबरत कुठेतरी जायला कुणाला तरी भेटायला कार्यक्रमांना हजेरी लावायला येते
कालच्या मोहनच्या बातमी पासून डोक्यात खुप विचारांचे वादळ आहे.आपल्या गृपमध्ये एका अन्य हीरोच्या बरोबरीने फिट दिसणारा आपला मित्र, असा रात्रीत झोपेतच जातो हे धक्कादायक आहे.
माझ्या अन्य परिचितेच्या कॉलेज गृपमधलाही असाच फिट दिसणारा हॅपी गो लकी मित्र शहा ४०/४२ वर्षे अमेरीकेत होता. रिटायर झाल्यावर अमेरीकेच्या कॅपिटॅलिस्ट कल्चर मध्ये आपली उपयोगीता संपली ह्या विचारानी ग्रासला, सर्वांशी बोलणे कमी झाले आणि मोहनसारखाच झोपेतच गेला.
दोघांच्या जाण्यात एक कॉमन गोष्ट म्हणजे डिप्रेशन.हल्लीच्या युगात डिप्रेशन हा सर्वात मोठा शत्रु झालेला आहे.
माझा एक अन्य कलिग कायमच येथे सोशल मिडीयावर संकटमालिका, अपघात, पॅरलिसीस, दोन जेल वाऱ्या, हार्ट ॲटॅक, सध्या वृद्धाश्रमात मुक्काम ह्याबद्दल लिहीतो. ते त्याचे लेखन रडगाणे ऐकवण्यासाठी नाही तर, त्याच्या सारखा सामान्य माणुस,आता पाय नीट चालत नाहीत तरी एवढ्या संकटातुन टिकुन रहातो, आनंदी राहू शकतो हे वाचुन इतरांना मनाला थोडी उभारी यावी म्हणून लिहीतो.
त्यावर दुसर्या एक मैत्रिणींनी लिहिलं ,"संकटे,आजार, अपघात, जेलच्या फेरी, heart attack, jail यातून कष्ट करून बाहेर आलास.पण Parkinson is very dangerous. No solution for this. Because of this, depression is the last step in it. My elder brother also had a cardiac attack. He had bypass surgery before 15 yrs. After that he is doing surgery for 8, 9 hours .He is a neurosurgeon. But because of Parkinson body slowly becomes rigid, stiff.हळू हळू विस्मरण देखील होते.तो सांगत असे
यावर उपाय काय ?
Everyone has something in his or her life.चलो मिलकर बात करे.तुम्ही बोलून सांगत आहात हे खूप चांगलं आहे. अगदी आतल न सांगण्यासारखं काही दुखत खूपत असेल तर सरळ तब्येतीचा बहाना सांगावा. पण आपण फार सुखी आहोत ,असा वर वरचा मुखवटा घालू नये, असं मला तरी वाटतं .हे माझं मत आहे.
. शांत राहु नका, गप्पा करा, भेटत रहा, आनंदात रहा. प्रकृति साथ देत नाही, प्रवास जमत नाही हे विचारच मनात येऊ द्यायचे नाहीत, लोक परदेश ट्रिपातुनही वेळ काढुन भेटायला येतात. दीपिका पादुकोण सारखी प्रथितयश नटी देखील कथितरित्या नैराश्याची शिकार होते .सुशांत सिंह राजपूतला देखील कथितरित्या नैराश्य आले होते
नैराश्य याबाबत एक उपाय आहे .बोलणे.मैत्री करणे.अर्थात ते सोपे नाही.
जो मित्र संकटे,आजार, अपघात, जेलच्या फेरी, heart attack, यातून कष्ट करून बाहेर आला तो खूप सोसलेला हा मित्र लिहितो,"मी नशिबवान आहे.जीवन सुंदर आहे.मित्र हे भाग्य आहे. आतादेखील हे लिहु शकतो आहे .दुसरा मित्र लिहीतो,"एकटा असतांना हार्ट अटॅक आला. महाशिवरात्रि मुळे खूप ट्रॅफिक होता आणि रस्ते बंद होते पण डॉ.शिरीष देवासारखे उभे राहीले, त्यांच्या मदतीला दिपक, बुलेट ट्रेन हेमंत आणि सगळेच होते नाहीतर मी मोहनच्या स्वागताला उभा असतो. वरती स्वर्ग द्वारी...
मला असं वाटतं की आपण आपला प्रॉब्लेम आपला दुखणं सांगितलं की लोक टर उडवतात "हीच तर नेहमीच काहीतरी दुखतंय. हीची नेहमीच तब्येत बरी नसते." असं म्हणतील. त्यामुळे मी पण हल्ली हल्ली आपल्या आपल्या कोशात राहावं या विचाराशी पोहोचले आहे .पण साधारणपणे बोलते व्हा असेच मानसशास्त्रज्ञ सांगतात.one by one losing threads of younger days. The void never to be filled.
मोहन पुढे गेलाय गेट टुगेदर ॲरेंज करायला, सगळे लोक एक एक करुन त्याला जॉईन करणारच आहोत. हे जाणे मृत्यु ते कुणाला टळलंय? टळलेले नाही म्हणुनच डिप्रेशन टाळुया सगळेच लोक.आनंदी राहु या.
भारतीय सैन्यातील कर्नल पदावर काम करुन सेवानिवृत्त झालेल्या माझ्या या वर्ग मित्राला श्रद्धांजली.
.***

