मुलाखत अमृता पवार
संवाद तुमचा आमचा मध्ये
अभिनेत्री अमृता पवार
वैशाली आहेर
स्वराज्य माता जिजाऊ साकारणारी अमृता पवार यांच्याशी हितगूज करण्याचा योग आला त्यांच्या बद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली जाणून घेऊया त्यांच्या शब्दाचा यांच्याबद्दल....
अमृता पवार यांना बालपणा बद्दल विचारले असता त्या सांगतात माझा जन्म बालपण अंधेरी मध्ये गेलं. शाळा-कॉलेज इकडेच झालं. पोद्दार कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं माझं बालपण खूप छान होत. आई-वडिलांनी आम्हाला मनासारखं स्वच्छंदीं जगू दिलं. मला जे हवं ते मिळालं.
अभिनयाबद्दल विचारले असता अमृता सांगते मी पाचवीला असताना रोहिणी वेलणकर संस्कृत शिकवायच्या, त्यावेळेस शाळेत त्या नाटक स्पर्धा एकांकिका घ्यायच्या. तेव्हा त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळाली.मी पाचवी ला असताना पहिली एकांकिका केली होतं.
त्या नंतर महाविद्यालयीन शिक्षण सुरू होत तेव्हा युथ फेस्टिवल नावाचं मुंबई युनिव्हर्सिची स्पर्धा असते त्यात मी सहभागी झाले होते. त्यातून माझी निवड झाली तेव्हा मला समीर खांडेकर आणि रणजीत पाटील यांच्याकडून अभिनयातील खूप बारकावे शिकता आले. त्याच दरम्यान एका ठिकाणी दुहेरी मालिकेचं ऑडिशन चालू होतं ते ऑडिशन देण्यासाठी मी गेले आणि सिलेक्ट झाले. दुहेरीमुळे संजय जाधव यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकाबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजते.
माझी पहिली मालिका दुहेरी. दुसरी लीड रोल असलेली मालिका ललित 205 आणि आता "स्वराज्यजननी जिजामाता" च आव्हान पेलण्याची तयारी करत आहे .माझा अजय फणसेकर दिग्दर्शित सीनियर सिटीजन नावाचा सिनेमा लवकरच येत आहे.
जिजाऊ बद्दल विचारायचं विचारला असता त्या अमृता सांगते की ऑडिशन दिल आणि माझे सिलेक्शन झालं. खरं तर त्यावेळेस माझा माझ्यावरच विश्वास नव्हता की खरच माझी निवड झाली आहे. मी खूप आनंदी होते. राजमाता जिजाऊंची भूमिका करण्याची मला संधी मिळतेय खूप मोठ आव्हान आहे माझ्यासाठी. जास्तीत जास्त चांगलं साकारण्याचा मी प्रयत्न करेल. सध्या त्याबद्दल ट्रेनिंग चालू आहे बाकी पुढे काय असेल ते लवकरच प्रेक्षक बघतीलच.
माझा आदर्श म्हणाल तर मी सुहास जोशी बरोबर ललित २०५ मध्ये काम केलं मला खरोखर त्यांच्यासारखं व्हायला आवडेल वयाच्या सत्तराव्या वर्षीही त्यांच्यामध्ये एवढा उत्साह आहे.चपळता आहे. सगळ्यांना सांभाळून घेण, समजावणं त्यामुळे मला त्यांच्यासारखं व्हायला नक्कीच आवडेल.
माझं स्वप्न होतं की मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायचे आणि माझं ते स्वप्न पूर्ण झाले इथून पुढे मला कोणत्याही भूमिका मिळो मी मनापासून करण्याचा प्रयत्न करेल
मी जर अभिनेत्री नसते तर कदाचित सीए असते.
चंदेरी दुनिया मध्ये येणारे माझ्या मैत्रिणींना मी सांगेल की दिसत एवढं सोपं नाहीये खूप स्ट्रगल आहे खूप सहनशक्ती असावी लागते तेव्हा आपण या क्षेत्रामध्ये टिकू शकता. ध्येय नक्की करून मनापासून काम केले की यश निश्चितच मिळते.
धन्यवाद अमृता ...आपल्याला राम दीप परिवारातर्फे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा..!!
