पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

एक होती एना

एक होती अँना (Ana)

.....एक होती अॅना,
गुलाबी, गोबऱ्या , गोऱ्या गालांची
खुद्कन हसणारी, फुलपाखरांच्या मागे धावणारी !
गावापासून दूर होते घर तिचे,
हिरव्या वनराईत उतरणीवर
गोल लांब वळण घेत ,
वाट लाल मातीची,
घरापर्यंत नेणारी,
ओढ्यावरच्या पुलावरून गावात शिरणारी!

आगगाडीची झुकझुक आणि इंजिनाची कुक्कुक,
ऐकली की अॅना धावत सुटायची,
लाल वाटेने,
शुभ्र पांढऱ्या फ्रॉकमध्ये,
मागे टाकून गुलाबी बोगनवेली
दगडांची भिंत असलेला चर्च ओलांडुन,
ती स्टेशनच्या आवारात शिरताना
आवाज द्यायची " पप्पा "
हात पसरून मिठी मारायची
काळ्या कळकट पप्पाला !

लाल वाटेने जाताना
हातात हात घालून
चिवचिवत घरी यायचे बापलेक !
"पप्पा पप्पा" म्हणंत ,
झोपाळ्यावर बापाच्या कुशीत
गोष्ट ऐकत झोपून जायची अॅना,
गोबऱ्या गुलाबी गालांची !

राजीवलोचन
८फेब्रु २०१६

© R.S.Pundlik

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू