पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मैत्री

✍️....

मैत्री सहज होते लागतं नाही सांगायला
मैत्रीत विश्वासा चा घागा लागतो जपायला....!

मिञ काही दिवसांनतर जिवलग होतो
कळत नाही आपल्या मनाला......!

मित्राकडे एखाद्या दिवशी नाही गेलो की
मित्र बोलतो आज आला नाहीं घराला...!

मित्राबरोबर कुठे फिरायला गेलो की खुप
आनंद होतो सर्व मित्रांना......!

मित्र किती ही मनात राग असला
हसत लावतो सगळ विसरायला......!

मैत्री धागे बांधून टिकतं नाही
आत्मविश्वास लागतो टिकवायला.....!

मैत्रीत सर्वाची मने लागतात जिंकायला
संकटात येतात अशीच नाती मदतीला...!

मी आहे काळजी करु नकोस
असं बोलला की आधार वाटतो मनाला....!


उमेश साळुके
पिंपरी गावं

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू