पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

*****बेधुंद वारा***

*****"बेधुंद वारा"*****

 

***************************

ऊसलली लाट सागरी,

   लहर लहरली पाण्यावरी!

सोडूनी सागरी कीनारा,

             बेधुंद झाला वारा!!

 

घेऊन संगे पुष्प सुगंध,

     वारा मस्तीत झाला धुंद!

वाऱ्याने केली कमाल  भारी,

  घेतली गरगर त्याने भरारि!!

 

घेऊन संगे पाला पाचोळा,

  ऊखडून टाकल्या झाडांच्या मुळा!

छते घरट्याची ऊडाली,

     पक्षीही घरट्यात दडली!!

 

गायी, गुरे सैर वैर धावली,

    वाकुन वीजेची खांबे गेली!

खेळनारे मुले घराकडे धावली,

    दारे खिडक्या सारे बंद झाली!

 

बेधुंद वऱ्याने धरतीही थरारली...!!

 

***************************

     सौं. सुनिता अ. जाधव

   निंभारी, नेवासा, अ. नगर.

***************************

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू