पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

दैवगती

दैवगती-यमदूत

अरे मानवा तुला घेईला येतोय रे
तु घरच्यांना त्रासून सोडतोय रे
खूप जीवापाड जीव लावला होता रे
माझ्यापासून आताच दूर करतोय रे.....!

तुझ्या आयुष्यात काय बदल होतेय
तुला कळुन न कळल्यासारखं वागतोय रे
तू सगळ्या नातेवाईकांना बोलवतोय रे
असं का म्हणतोय रे.....!

जगण्याची इच्छा आहे रे
तुला अजून खूप करायचं आहे रे
तुझ्या मनांत भरपूर स्वप्न होती रे
तूला हे जग पाहवयाच आहे रे.....!

अरे मानवा तूझ संगळ मान्य करतोय रे
तुझ्ं आयुष्य विधीलिखित आहे रे
तू म्हणशील अजून थांबायच आहे रे
तुझ्या सांगण्यावरून कोण ऐकत रे.....!

अरे मानवा तुझा करार झाला रे
तुला कुणाला भेटायचं होत रे
तू घरच्यांना सांगितले आहे रे
तू बाहेर सांगून आला आहे रे.....!

अरे मानवा काळ आला आहे रे
तूला कुठून ही उचलून नेतील रे
तुला कारण बोलुन घेऊन जातील रे
कुणालाचं चुकला नाही रे....!

दैवगती अचानक येती रे
नियती पुढे काही नाही रे
मृत्यू हा अटळ आहे रे
यमदूतचं काम आहे रे.....!

उमेश प्रकाश साळुंके
पिपरी चिंचवड

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू