पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सैनिक

सैनिक


सैनिक मी लढतो देश्याच्या सीमेवर

नितांत प्रेम, श्रद्धामाझी या मायभूवर

रक्षण या भूमातेचे प्राण हजारो अर्पण

नित्यरोज वीर आम्ही देऊ बलिदान!!


पाऊल आता न हटणार मागे

सज्ज राहू सदैव, फडकू नभात तिरंगा

शपत घेतली आम्ही याभूमातेच्या रक्षणाची

चिंता नाही आम्हा आता प्राणांची!!


सीमेवर लढताना देऊ प्राणांची आहुती

तिरंग्याचा राखू मान, फाडून वैऱ्याची छाती

जो करील या देशाचे तुकडे

शिकवू त्यांना चांगलेच धडे!!


नजर ज्यांची अशेल काश्मीरकडे,

पिऊनी त्यांचा लहू उडवू त्यांची धडे

हिंदुस्थानच्या जयघोषाचे वाजवू चौघडे

मारूनही अमर आम्ही होऊ,

मायभुच्या रक्षणासाठी जन्म पुन्हा पुन्हा घेऊ!!


####################

      सौ.सुनिता अ.जाधव

निंभारी, नेवासा, अ.नगर

मो. 9921471597



पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू