पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आई

 

"आई"

कवितेचं नांव -आई

काय सांगू आई तूला
भास होतो सारखा मला
पहिल घरी आलो की
बघतो तूला.....!

आई खुप सांगायचं तुला
तोंड भरून बोलायचं मला
गावावरून कधी येशील
असं होतयं मला....!

आई तुझ्या हातचं जेवण
करायचं मला खुप भूक
लागली बोलू सांग आई
आता कुणाला....!

आई तुझी तब्येत बरी
आहेना सांग ना मला
उगीच झोपून राहु नको
तुझ्या शिवाय कोण
नाही आम्हाला....!

आई काही हरवले
की शोधून देते मला
आज माझी वस्तू भेटत
नाही विचारू कुणाला.....!

आई घरी आलीचं नाही
शोधायला लावू कुणाला
विचारलं सगळ्यांना तयार
नाही कुणी बोलायला....!

आई आई आई गं
आता कधीचं भेट
होणारं नाही वाटलं
होतं आम्हाला....!

आई तुझ्या मनांत
राग नाही ना गं
माझ्याविषयी आई....!

तुझ्याशिवाय प्रेमळ
आई मिळणारं नाही
आता आम्हाला.....!

उमेश प्रकाश साळुंके
पिपरी चिंचवड

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू