पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्वर्गीचा आनंद

स्वर्गीचा आनंद 

==============
आकाशांत चंद्र आला ,
आज कोजागिरी ;
अमृताची बरसात ,
होई धरेवरी .

सागरास आली भरती ,
उचंबळे लाट ;
आतुरती झाली बघ ,
घेण्या चंद्र भेट .

रोहिणी ही चंद्रासंगे ,
हासते ग गाली ;
चांदण्यांची ओठणी ,
धरा पांधरली .

वृक्षवल्लर्या ह्या सार्या ,
अमृतांत न्हाती ;
वार्यासंगे तालावर ,
आनंदे डोलती .

गोकुळांत घुमला ,
नाद बासुरीचा ;
कदंबातळी होई ,
मेळा गोपिकांचा .

रासरंगे बाई ,
गोपी विसरल्या भान ;
कृष्णमय मन झाले ,
कृष्ण मय तन .

संसाराचे तुटले बंध ,
कृष्ण कृष्ण छंद ;
कृष्णमय होता,
स्वर्गीचा आनंद .
स्वर्गीचा आनंद.

माधवी करमळकर'नीति'

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू