पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सावित्री -ज्योती

सावित्री ज्योती आभाळाएवढी माणसं होती.....!!

घेतला वसा शिकण्याचा अन् अशिक्षिता शिकवण्याचा

केले शिक्षित अबलांना अन् धीर दिला शोषितांना.....!!

विधवेचा करून सांभाळ प्रतिकार केला अनिष्ठेचा

विद्येचे हे देऊन दान घालविले बरबटलेले भान......!!

शेतकर्‍यांच्या असूड घेऊन तळपले हो पहा ज्योतिबा

विद्येविना मती गेली दिले पटवून समद्यांना......!!

विद्येचा करून विस्फोट सबळ बनविले अबलांना

ज्ञान  दिल्याने ज्ञान वाढते पटवून सांगितले सर्वांना...!!

प्रथम घडली सावित्रीबाई झाली जनतेची माई

शेण गोटे अनिष्ट रुढी दिला फाटा यांना धैर्यानी.....!!

कोणी कितीही घालो घाव वाट काढली शिताफीनी

यशवंताला दत्तक घेऊन केली सेवा प्लेग रोग्यांची...!!

रोग्यांची ती करीत सेवा वाहू लागली खांद्यावरी

रोगाची मग लागण झाली प्राण त्यागीला आईनी....!!

घेऊन वसा पुढेच जावे दिधला धडा त्या माईनी

सदैव मी कोरले हृदयी.........

सावित्री ज्योती आभाळाएवढी माणसं होती

............आभाळाएवढी माणसं होती................!!

 

✍️....सौ. किरण पुरुषोत्तम कावळे

         गोरेगाव, जि. गोंदिया (म. रा.)

          मो. नं. -9370539093

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू