भाऊबीज
बहिण-भावाचे नाते
हे जगा पेक्षा वेगळेच असते.
राग,लोभ असतो तिथे
आणि भरपूर प्रेम असते.।
छोट्या छोट्या गोष्टीवरून
भांडण खूप करतात ते.
तुझ माझ जमे ना आणि
तुझ्या शिवाय करमत नसते.।
भावा-बहिणीचे नाते म्हणजे
पवित्र धाग्याने गुंफलेले.
जन्मापासून मरतपर्यत
अतुट असे बांधलेले.।
शब्दांमध्ये न सांगता येणारे
भाऊ-बहिणीचे नाते हे.
प्रेम, जिव्हाळा आणि विश्वासा.
तीथेच टिकून राहिलेले.।
बहिण सासरी चालली म्हणून
लपुन लपून रडत असतो.
बहिणीच्या मागे खंबीरपणे
भाऊ हाच उभा असतो.।
देवाचे मी आभार मानते
त्याने मला भाऊ दिले.
आईवडीलां नंतर माझे
माहेरपण टिकवून ठेवले.।
सौ. जान्हवी जोशी.
भाऊबिजेच्या सर्व भावांना
हार्दिक शुभेच्छा.❤????????❤
