नीलवर्णी फुल
ते फुल सुंदर
नाजुक नीलवर्णी.
शोभुनी दिसते
गुंफलेल्या वेलीवरती.।
पंचपाकळ्या त्या सुंदर
दोन रंगाच्या छटा.
सुंदर असते किती
ती देवाचीही लीला.।
मध्यम तो पिवळा पांढरा
परागही शोभून आला.
नीळ्या रंगात जांभळी छटा
काय वर्णन करु आता.।
असतो तो रंग साधाभाळा
नीलकंठा प्रमाणे नीळा.
शोभुनी दिसतो तो अंगी
नीलवर्ण राम, क्रुष्णाचा.।
सौ. जान्हवी जोशी.
