दिवाळीच्या शुभेच्छा.
दिवाळीचा दिवस आला
दिपोत्सव साजरा करुया.
उजळुनी गेले जग ते सारे
रंगीबेरंगी लाऊनी माळा.।
दिवाळीला सुरुवात ती झाली
आज तो आहे दिवस ही पहिला
पणती तेवत वात तेजाची
वसुबारसची करुनी पुजा.।
सागर मंथनातून घेऊनी अम्रुत
प्रगट झाली ती वैद्य धनवंन्तरी
यम दिप तो दान करुनी
पुजा करु कुबेर, धनवंन्तीरीची.।
दाट धुक्याने पाहाट झाली
थंडीची ती सुरुवातच होती.
अभ्यंगस्नान सर्व जण करुया
नर्कचतुर्दशी ती आली.।
प्रदोष काळी दिवे लाऊनी
लक्ष्मी पुजन करु मिळुनी.
सुख,सम्रुध्दी, ऐश्वर्य घेऊनी
घरात तुमच्या आली लक्ष्मी.।
बळीराजा हा असुर कुळी
पदाचा तो गर्व करी.
त्याला मारण्या विष्णु प्रगटले
प्रतीपदेला वामन अवतार घेऊनी.।
भाऊ-बहिणीचे प्रेमाचे अतुट बंधन
असते ते जन्मोजन्मांतरीचे.
भाऊबीजेला ओवाळुनी आपण
वाढवु आयुष्य त्या भाऊरायाचे.।
स्वदिस्ट ते भोजन तयार केले
दिवाळीचा फराळ बनवुनी.
साजरी केली पुर्ण दिवाळी
रांगोळी अलंकारीत काढूनी.।
विविध रंगी फटाक्यांची
आतिशबाजी भरपूर केली.
पांडव पंचमी पर्यंत दिवाळीच्या
शुभेच्छा दिल्या आप्तेष्टांनी.।
सौ.जान्हवी जोशी.
