पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

उन्हात मोगरा

उन्हात मोगरा...!

सरी..फुलाफुलांच्या अन्,
पाऊसही..पाकळ्यांचा..!
उत्सव तुझ्या मनातला,
गालातल्या गालात हसण्याचा...

किती... लाघवी...कटाक्ष!,
होते मग .. ती किमया..
जीव जातो खिळून अन,
लागतो बेहोश व्हाया...!

मज वाटे तू दाखवावास,
भलताच ऋतू...आवडीचा..
अन यावा फुलून मग,
मोगरा...उन्हाळ्याचा...!

वाटते मलाही जरा,
हा काळ कोणत्या ऋतूचा..?
झरत्या मनात गरगरा,
गोल भोवरा फिरण्याचा.?!

 

प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे.©
दि.०८/१२/२०१६.
सहज सुचलेली....

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू