पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

उषःकाल होता होता.

रातराणीचा सुगंध घेऊनी,

अंधार तो संपला आता.


उजेड झाला सर्व दिशेला,

उषःकाल होता होता.


स्वागत करण्या भास्कराचे,

उषा सजली साज घालुनी.


लाली घेऊनी पुर्व दिशेला,

सप्ताश्ववाहन अवतरले भूवरी.


झाडे-वेली बहरुनी आली,

रंगबिरंगी विविध फुलांनी.


पक्षांची किलबिलाट सुरु ती,

अंबरी ते भ्रमण करुनी.


सोनेरी ती रवीकिरणे,

अलगद अवनी वरती आली.


दर्शन घेऊनी नारायणाचे,

सुरुवात झाली नवीन दिवसाची.


                  सौ. जान्हवी जोशी.


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू