चारोळ्या
पाण्यातील प्रतिबिंबावर जाऊ नकोस तु
पाणी हलले की सारेच साफ होईल
वरवरच्या वागण्यावर जाऊ नकोस तु
अंतकरण उलगडले की सारे कळून येईल
मनातील गोडवा अन आसमंतातील गारव्याने मन आणि तन ओशट होते
पण स्वार्थी आचार आणि पुळचट विचाराने मन बोथट नि तन कळकट होते
लोक म्हणतात प्रेम व्हावे लागते
प्रेम करुन होत नाही
मग हेच लोक का म्हणतात की
कुठलीच गोष्ट केल्याशिवाय होत नाही.
तुझ्या हृदयात भलेही नको जागा देऊस
तुझ्या हृदयाच्या दाराशी उभे राहू दे ना
तुझ्या हृदयात कोण प्रवेश करु इच्छिते
ते हृदयाच्या दाराशी उभे राहून पाहू देना
