आशेचा किरण
ज्योत मावळली अंगणी
पसरला अंधकार आसमंती
अंधकारात सुटला आधार
दुर गेल्या भिंती ||घृ||
अंधारात एकटाच चालत
होतो मी भयान
ना वेली ना वृक्ष
कोणी देईना आधार ||१||
हात पाय पसरत
साद मागता मदतीची
येईना कोणी पुढे
जाई दूर पळूनी ||२||
स्वप्नात दिसला आशेचा
किरण मजला एक
चिमण्यांच्या चिवचिवाटाने
आली मजला जाग ||३||
अथर्व विनायकराव वसेकर
