प्रेम.
प्रेमाशिवाय सगळ्यांच,
अडत असते नेहमीच.
प्रेम नसते तर आईची माया,
कळली नसती कधीच.
देवाने सर्वांना जन्मताच,
प्रेम करणे शिकविले.
प्रेमाशिवाय इतके लोक
जवळ कधी आले नसते.
आईवडिल,बहिण-भाऊ,
यांचे प्रेम वेगळेच असते.
जीवाला जीव लावणारी,
मित्रमंडळी आपलीच असते.
माणसाने जीवनात सर्व विसराव,
पण आपल्या माणसाला कधीच नाही.
त्यांच्या शिवाय जीवन जगणे,
हे कोणालाही कधी जमले नाही.
सौ. जान्हवी जोशी.
